ठाणेकरांनो सावधान… काळजी घ्या! कोरोना फास आवळतोय; मुंब्य्रात तरुणाचा बळी, तीन दिवसांत आढळले दहा रुग्ण

ठाणेकरांनो सावधान… काळजी घ्या! कोरोना फास आवळतोय; मुंब्य्रात तरुणाचा बळी, तीन दिवसांत आढळले दहा रुग्ण

कोरोनाची बाधा झालेल्या एका तरुणाचा आज कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात मृत्यू झाला. मुंब्रा येथे राहणाऱ्या या तरुणाला मधुमेहाचा त्रास होता. त्यामुळे त्याला शुक्रवारी कळवा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याची कोरोना टेस्टही पॉझिटिव्ह आली होती. उपचार सुरू असताना आज सकाळी त्याचा मृत्यू झाला. शहरात गेल्या तीन दिवसांत कोरोनाची बाधा झालेले १० रुग्ण आढळून आल्याने नागरिकांनी सावधगिरी बाळगावी, स्वतःची आणि कुटुंबाची काळजी घ्यावी, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.

ठाणे शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागल्यानंतर महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी शुक्रवारी तातडीने विभागप्रमुखांची बैठक घेऊन कोरोना रुग्णांची माहिती घेतली होती. त्यानंतर त्यांनी सर्वच रुग्णालयांनी सतर्क राहावे असे निर्देश दिले होते. ही बैठक होऊन एक दिवसही उलटला नाही तोच आज सकाळी कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात एका २१ वर्षीय तरुणाचा कोरोनामुळे मृत्यू झाला.

मुंब्रा येथील या २१ वर्षीय तरुणाला वयाच्या सातव्या वर्षांपासून मधुमेहाचा त्रास आहे. शुक्रवारी त्याला कुटुंबीयांनी कळवा रुग्णालयात दाखल केले होते. मधुमेह आणि अॅसिडोसिसच्या गुंतागुंतीमुळे उपचार करणे अवघड होते. त्यातच या तरुणाच्या फुप्फुसांमध्ये संसर्ग झाल्याने त्याची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली. आज उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला, असे कळवा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अनिरुद्ध माळगावकर यांनी सांगितले.

काही रुग्णांवर घरीच उपचार
ठाणे शहरात सध्या कोरोनाची बाधा झालेले १० रुग्ण आहेत. त्यापैकी काही रुग्णांवर घरीच उपचार सुरू आहेत. कळवा रुग्णालयातील कोरोनाच्या विशेष कक्षात सध्या दोन रुग्णांना दाखल करण्यात आले आहे. कोरोनाचे वाढत चाललेले रुग्ण आणि तरुणाचा गेलेला बळी यामुळे ठाणेकरांची चिंता वाढली आहे. कोरोना रुग्णांच्या तपासणीसाठी आरोग्य विभागाने आणि सर्वच रुग्णालयांनी सतर्क राहावे, असे निर्देश महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले आहेत. शहरात कोरोनाचा पहिला बळी गेल्यानंतर महापालिका प्रशासन आणि आरोग्य यंत्रणेची पळापळ उडाली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

कोकणात आता हायटेक रो-पॅक्स बोटीतून चला, मुंबई ते मालवण इतक्या कमी वेळात गाठा कोकणात आता हायटेक रो-पॅक्स बोटीतून चला, मुंबई ते मालवण इतक्या कमी वेळात गाठा
मुंबईतील भाऊचा धक्का ते मांडवा ( अलिबाग ) रो-रो सेवेला मिळालेला उत्स्फुर्त प्रतिसाद पाहून आता कोकणातही हायटेक रो-रो बोटीची सेवा...
राणी मुखर्जीने तोंडाने सापाचे विष बाहेर काढले… व्हिडिओ पाहिल्यावर माधुरीचे पती डॉक्टर नेनेंनी डोक्यालाच हात लावला
‘तू प्रेग्नेंट दिसतेस…’ आलिया भट्टने दुसऱ्यांदा दिली गुड न्यूज? कान्समध्ये ब्लॅक गाऊनमध्ये दिसलं बेबी बंप? लूकवर चाहत्यांची कमेंट
रस्त्यावर कोणी बहिणीची टिंगल केली की..; नाना पाटेकरांचा सर्व पुरुषांना कडक सल्ला
पिवळी साडी,अंगभर दागिने; जेव्हा ऐश्वर्याची कान्सच्या रेड कार्पेटवर रथातून भव्य एन्ट्री झाली, फक्त टाळ्यांचा कडकडाट
Super Food : जगातील सर्वात ताकदवान भाजी, गुडघेदुखीवर रामबाण उपाय…
IPL 2025 – प्ले ऑफच्या धुरळ्यापूर्वीच पंजाबला तगडा झटका, हॅट्रीक घेणाऱ्या खेळाडूला दुखापत