श्री विठ्ठल मंदिर चोवीस तास खुले राहणार

श्री विठ्ठल मंदिर चोवीस तास खुले राहणार

आषाढी यात्रा कालावधीत श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी मोठय़ा संख्येने भाविक येतात. या आषाढी यात्रा कालावधीत येणाऱ्या भाविकांना मंदिर समितीमार्फत मुबलक सोयीसुविधा उपलब्ध करण्यात येणार आहेत. तसेच भाविकांचे सुलभ व जलद दर्शन व्हावे, यासाठी 27 जूनपासून 24 तास दर्शन व्यवस्था उपलब्ध होणार असल्याची माहिती मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली.

आषाढी यात्रेच्या अनुषंगाने मंदिर समितीची बैठक सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या अध्यक्षतेखाली श्री विठ्ठल-रुक्मिणी भक्तनिवास येथे संपन्न झाली. बैठकीस मंदिर समितीचे सदस्य शपुंतला नडगिरे, डॉ. दिनेशकुमार कदम, भास्करगिरी बाबा, संभाजी शिंदे, ह.भ.प. ज्ञानेश्वर देशमुख जळगावकर, अॅड. माधवी निगडे, ह.भ.प. प्रकाश जवंजाळ, ह.भ.प. शिवाजीराव मोरे, कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, व्यवस्थापक मनोज श्रोत्री, लेखा अधिकारी मुकेश अनेचा तसेच पुरातत्व विभागाचे रामेश्वर निपाणे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे श्रीनिवास गुजरे, सर्व खातेप्रमुख, वास्तुविशारद तेजस्विनी आफळे व जतन–संवर्धनाचे ठेकेदार उपस्थित होते.

आषाढी एकादशी 6 जुलै रोजी आहे. यात्रेचा कालावधी दि. 26 जून ते दि. 10 जुलै असा आहे. शासकीय महापूजा 2.20 वाजता मुख्यमंत्री व मानाचे वारकरी यांच्या हस्ते सपत्नीक केली जाणार आहे. तसेच आषाढी यात्रेत भाविकांना सुलभ व जलद दर्शन उपलब्ध करून देण्यावर मंदिर समितीचा भर राहणार असून भाविकांसाठी विविध सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. चंदनउटी पूजेची दि. 13 जून रोजी सांगता पूजा होणार असल्याची माहिती कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली.

बैठकीत गोंधळ
श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या आषाढी वारीसंदर्भात सुरू असलेल्या बैठकीत सामाजिक कार्यकर्त्यांनी गोंधळ घालत मंदिर समिती बरखास्त करण्याची मागणी केली. तसेच बीव्हीजी पंपनीचा ठेका रद्द करावा. ठेकेदारीवर पाच कोटी रुपये खर्च करण्यापेक्षा सेवाभावी तत्त्वावर भाविकांना मोफत सेवा करण्याची संधी द्यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;