सर्जा-राजाच्या जोडीला लाखाचा भाव; वय कमी अन् ताकद जास्त

सर्जा-राजाच्या जोडीला लाखाचा भाव; वय कमी अन् ताकद जास्त

पावसाळा सुरू झाल्यानंतर शेतीच्या मशागतीला वेग आला आहे. त्यामुळे जनावरांच्या बाजारात बैलजोडी खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांची गर्दी वाढली आहे. मागणीच्या तुलनेत बैलांची संख्या कमी असल्याने सर्जा-राजाच्या जोडीने मोठा भाव खाल्ला आहे. दोन बैल खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांना एक लाख रुपये मोजावे लागत आहेत. बैलांचे वय जितके कमी तितकी त्याची ताकद जास्त असते. त्यामुळे कमी वयाचे बैल खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांना अधिक पैसे मोजावे लागत आहेत.

सध्याच्या काळात अनेक शेतकरी आपल्या शेतीची मशागत ट्रॅक्टरने करतात. मात्र आंतरगत मशागतीसाठी बैलांचा वापर करावा लागतो. अवकाळी पावसाने सुमारे महिनाभर धुमाकूळ घातल्यानंतर आता मान्सून सुरू झाला आहे. त्यामुळे पेरणी आणि अन्य मशागतीची कामे सुरू होणार आहेत. त्यासाठी शेतकऱ्यांचा कल बैलजोडीच्या खरेदीकडे वाढला आहे. मात्र वाडा तालुक्यात कुठेही जनावरांचा बाजार भरत नाही. त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांना बैलजोडीच्या खरेदीसाठी शेजारच्या जिल्ह्यात जावे लागत आहे. डिझेल आणि स्पेअर्सपार्टच्या किमतीत मोठी वाढ झाल्याने ट्रॅक्टरचालकांनी मशागतीचे दर वाढवले आहेत. हे दर शेतकऱ्यांना परवडत नसल्याने अनेक शेतकरी पुन्हा बैलांच्या पारंपरिक मशागतीकडे वळले आहेत. त्याचा जोरदार परिणाम बैलजोडीच्या किमतीवर झाला आहे.

शारीरिक क्षमता, बांध्यानुसार किंमत
आंतर मशागत करण्यासाठी शेतकऱ्यांकडून चांगल्या बैलजोडीचा शोध घेत खरेदी केली जाते. यात शारीरिक क्षमता अधिक असणाऱ्या गोंडस दिसणाऱ्या बैलजोडीला अधिक पसंती देत आहेत. पावसाळ्यात जनावरांना मुबलक चारा उपलब्ध होतो. त्यामुळे पशुपालक, शेतकऱ्यांना चाऱ्याची वेगळी व्यवस्था करण्याची आवश्यकता नसते. परिणामी दुभत्या जनावरांना मागणी वाढली आहे.

जनावरांच्या किमती

  • गावरान बैलजोडी – 40 ते 90 हजार
  • हायब्रीड बैलजोडर्डा – 50 ते 80 हजार
  • खिल्लार बैलजोडी – 90 ते 95 हजार
  • दुभती गाय – 35 ते 50 हजार
  • दुभती म्हैस – 60 ते 80 हजार
Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;