मिंधे गटाचे पदाधिकारी अशोध धोडी यांच्या हत्येप्रकरणी सख्ख्या भावाला अटक, 6 महिन्यानंतर अडकला पोलिसांच्या जाळ्यात

मिंधे गटाचे पदाधिकारी अशोध धोडी यांच्या हत्येप्रकरणी सख्ख्या भावाला अटक, 6 महिन्यानंतर अडकला पोलिसांच्या जाळ्यात

मिंधे गटाचे डहाणू विधानसभा समन्वयक आणि माथाडी सेनेचे तालुका अध्यक्ष अशोक रमण धोडी यांच्या निर्घृण हत्येप्रकरणी तब्बल सहा महिन्यांनंतर मुख्य आरोपी अविनाश धोडीला अखेर पालघर स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. या प्रकरणाने पालघर जिल्ह्यात खळबळ उडवून दिली होती. न्यायालयाने वॉरंट काढूनही पोलिसांच्या ताब्याबाहेर राहिलेल्या या आरोपीला पकडण्यात यतीश देशमुख यांच्या नेतृत्वाखालील नवीन पोलीस प्रशासनाला मोठे यश मिळाले आहे. आरोपी अविनाश धोडी हा अशोक धोडी यांचा सख्खा भाऊ असून तो दारू माफिया म्हणून कुख्यात आहे.

20 जानेवारी 2025 रोजी अशोक धोडी मुंबईहून डहाणूच्या दिशेने निघाले होते, पण रात्री घरी परतलेच नाहीत. त्यानंतर कुटुंबीयांनी त्यांच्या अपहरणाचा आणि घातपाताचा संशय व्यक्त केला. तपासाच्या सुरुवातीलाच संशयाची सुई अशोक धोडी यांचा सख्खा भाऊ अविनाश धोडीकडे वळली. मात्र चौकशीसाठी बोलावल्यावर तो पोलिसांच्या चौकीतून पळून गेला होता.

काय आहे प्रकरण?

मिंधे गटाचे पदाधिकारी अशोक धोडी हे कामानिमित्त डहाणू येथे कार ठेवून ट्रेनने मुंबईला गेले होते. 20 जानेवारी रोजी सोमवारी संध्याकाळी डहाणू रेल्वे स्थानकात उतरून बोर्डी-बोरीगावमार्गे वेवजी येथे घरी येण्यासाठी निघाले. मात्र ते घरी पोहोचलेच नाहीत. तेव्हापासून अशोक धोडी आणि त्यांची कार बेपत्ता होती. पोलिसांनी आठ दिवसांनंतर अपहरणाचा गुन्हा नोंद केला. दरम्यान, 31 जानेवारीला गुजरातमधील सरीगाम येथील बंद खाणीत गाडीच्या डिकीत धोडी यांचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत आढळून आला. यानंतर तपासाची चक्रे फिरवत पोलिसांनी चार आरोपींना अटक केली. तर या प्रकरणातील मुख्य आरोपी अविनाश धोडी वेवजी येथील पोलीस चौकीतून फरार झाला होता. आता त्याला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;