मला भाजप सोडण्यासाठी भाग पाडले; यूटय़ूबरचा गौप्यस्फोट

मला भाजप सोडण्यासाठी भाग पाडले; यूटय़ूबरचा गौप्यस्फोट

बिहार विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून, प्रत्येक पक्षाने पंबर कसली आहे. यादरम्यान बिहारमधील भाजप नेते, यूटय़ूबर मनीष कश्यप यांनी भाजपच्या सदस्यपदाचा राजीनामा दिला आहे. भाजपमध्ये मी स्वतःचे रक्षण करू शकत नाही, इतरांना मदत कशी करू शकतो, अशी भावनिक पोस्ट फेसबुकवर टाकत त्यांनी राजीनामा दिला. मला भाजप सोडण्यासाठी भाग पाडल्याचे त्यांनी सांगितल्याने खळबळ उडाली आहे. वर्षभरापूर्वी भाजप नेते मनोज तिवारी व अनिल बलुनी यांच्या उपस्थितीत कश्यप यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता.

काही दिवसांपूर्वी तामीळनाडूमध्ये बिहारमधील कामगारांची पिळवणूक केली जाते, त्यांना त्रास दिल्याचा व्हिडिओ टाकल्याने कश्यप चर्चेत आले होते. त्यानंतर मुख्यमंत्री स्टॅलीन व मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी या वादावर पडदा टाकला होता. मनीष कश्यप यांना भाजपच्या लोकांकडून त्रास दिल्याचे प्रकार समोर येत होते. भाजपमध्ये ते अस्वस्थ व नाराज असल्याचे संकेत त्यांनी दिले होते. त्यानंतर पटना मेडिकल कॉलेजमध्ये काही डॉक्टरांनी मारहाण केल्याची घटना समोर आली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;