Ratnagiri accident – रत्नागिरीत गॅस टँकरची खासगी ट्रॅव्हल्सला धडक; वायू गळतीमुळं आग, घरं जळाली, 7 गंभीर जखमी

Ratnagiri accident – रत्नागिरीत गॅस टँकरची खासगी ट्रॅव्हल्सला धडक; वायू गळतीमुळं आग, घरं जळाली, 7 गंभीर जखमी

मुंबई-गोवा महामार्गावर चिपळूणहून रत्नागिरीकडे येणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्सला सीएनजी टँकरने धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात खासगी ट्रॅव्हल्समधील सात गंभीर जखमी झाले आहेत. अपघातानंतर खासगी ट्रॅव्हल्स 20 फूट दरीत कोसळल्याने अनेकांना दुखापत झाली आहे.

रविवारी सकाळी आठ वाजता बावनदी येथील रस्त्यावर मागून भरधाव येणाऱ्या गॅस टँकरने खासगी ट्रॅव्हल्सला धडक दिली. खासगी ट्रॅव्हल्समधून शिक्षक प्रशिक्षणासाठी रत्नागिरीत येत असताना हा अपघात घडला.

मागून गॅस टँकरने धडक देताच खासगी ट्रॅव्हल्सच्या चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि खासगी ट्रॅव्हल्स दरीत कोसळली. ट्रॅव्हल्समधील सात शिक्षकांना गंभीर दुखापत झाली असून उर्वरित शिक्षकही जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

गॅस टँकर रस्त्यावर पलटी झाल्यानंतर वायू गळती होऊन परिसरात आग लागली. काही झाडे आणि रिकामी घरे जळाली आहेत. प्रशासन आणि पोलीस यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे स्वतः घटनास्थळी उपस्थित असून संपूर्ण परिस्थितीवर नजर ठेवून आहेत.

दरम्यान, अपघातामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. सध्या ही वाहतूक पाली-संगमेश्वर मार्गे वळवण्यात आली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;