Mumbai News – माटुंग्यात भररस्त्यात चौघांवर प्राणघातक हल्ला, घटना सीसीटीव्हीत कैद

Mumbai News – माटुंग्यात भररस्त्यात चौघांवर प्राणघातक हल्ला, घटना सीसीटीव्हीत कैद

मुंबईतील माटुंगा परिसरात भररस्त्यात चौघांवर तलवारी, चाकू आणि काठ्यांनी हल्ला केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी सात जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. हल्ल्याची संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. कौटुंबिक वादातून हा हल्ला झाल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. पोलीस याप्रकरणी सखोल तपास करत आहेत.

माटुंगा येथे शनिवारी रात्री आठ ते दहा जणांच्या गटाने तलवारी, चाकू आणि काठ्यांनी भररस्त्यात चौघांवर हल्ला केला. हल्लेखोरांनी आपली ओळख लपवण्यासाठी स्कार्फ आणि हेल्मेटने चेहरे झाकले होते. याप्रकरणी पोलिसांनी आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून सात संशयितांना आधीच ताब्यात घेतले आहे.

हल्ल्यात सहभागी असलेल्या अन्य आरोपींची ओळख पटवण्याचा आणि त्यांना पकडण्याचा पोलीस प्रयत्न करत आहेत. भररस्त्यात झालेल्या या घटनेमुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;