Upcoming IPO: शेअर बाजारात गुंतवणुकीची मोठी संधी, 4 नवीन IPO येतायत; वाचा सविस्तर

Upcoming IPO: शेअर बाजारात गुंतवणुकीची मोठी संधी, 4 नवीन IPO येतायत; वाचा सविस्तर

शेअर बाजारातील गुंतवणूकदारांसाठी पुढील आठवडा खास ठरणार आहे. नवभारत टाइम्सच्या वृत्तानुसार, पुढील आठवड्यात चार नवीन इनिशियल पब्लिक ऑफरिंग्सची (IPO) बाजारात एण्ट्री होणार आहे. याचबद्दल अधिक माहिती जाणून घेऊ…

Oswal Pumps

ओसवाल पंप्स ही एक वॉटर पंप उत्पादक कंपनी आहे. याचा आयपीओ 13 जून ते 17 जून पर्यंत खुला असेल. तो मेनबोर्ड सेगमेंटमध्ये लिस्टेड असेल. याचे शेअर्स बीएसई आणि एनएसई दोन्हीवर लिस्टेड असतील. आयआयएफएल कॅपिटल या आयपीओचे व्यवस्थापन करत आहे. कंपनीने अद्याप याच्या किंमतबद्दल कोणतीही माहिती दिलेली नाही. कंपनी लवकरच त्याची घोषणा करेल.

Sacheerome IPO

सचीरोम ही एक केमिकल उत्पादक कंपनी आहे. तिचा आयपीओ 9 जून रोजी उघडेल आणि 11 जून रोजी बंद होईल. याच्या शेअर्सची किंमत 96 – 102 रुपयांच्या दरम्यान असेल. कंपनीला 61.62 कोटी रुपये उभारायचे आहेत. याचे शेअर्स एनएसई एसएमई प्लॅटफॉर्मवर लिस्टेड केले जातील. जीवायआर कॅपिटल अॅडव्हायझर्स या आयपीओचे व्यवस्थापन करत आहे.

Jainik Power and Cables

जैनिक पॉवर अँड केबल्सचा आयपीओ 10 जून रोजी उघडेल आणि 12 जून रोजी बंद होईल. याच्या शेअर्सची किंमत 100 ते 110 रुपयांच्या दरम्यान असेल. कंपनी 51.30 कोटी रुपये उभारू इच्छिते. हा आयपीओ एनएसई, एसएमई प्लॅटफॉर्मवर येईल. फास्ट ट्रॅक फिनसेक या आयपीओचे व्यवस्थापन करत आहे. ही कंपनी पॉवर केबल्स आणि वायरिंगचे उत्पादन करते.

Monolithisch India

मोनोलिथिश इंडिया ही एक इंजिनिअरिंग कंपनी आहे. ही कंपनी 12 जून रोजी आपला आयपीओ आणत आहे. कंपनीचे उद्दिष्ट 82.02 कोटी रुपये उभारण्याचे आहे. याच्या शेअर्सची किंमत 135 ते 143 रुपयांच्या दरम्यान असेल. हा आयपीओ 16 जून रोजी बंद होईल. याचे शेअर्स एनएसई, एसएमई प्लॅटफॉर्मवर लिस्टेड केले जातील. हेम सिक्युरिटीज या आयपीओचे व्यवस्थापन करत आहे.

डिस्क्लेमर: वरील बातमी फक्त माहितीच्या उद्देशाने आहे. याचा ‘सामना ऑनलाईन’ कोणताही संबंध नाही. बातमीतील माहिती सामान्य स्वरूपाची असून, गुंतवणूक किंवा अन्य निर्णय घेण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Mumbai News – पत्नीवर गोळ्या झाडून पतीने स्वतःलाही संपवले, वरळीतील खळबळजनक घटना Mumbai News – पत्नीवर गोळ्या झाडून पतीने स्वतःलाही संपवले, वरळीतील खळबळजनक घटना
मुंबईतील वरळी परिसरात खळबळजनक घटना घडली आहे. 60 वर्षीय पतीने 53 वर्षीय पत्नीवर गोळी झाडून तिची हत्या केली. त्यानंतर पतीने...
गडचिरोलीत 1 लाख झाडांची होणार कत्तल, लोह खनिज प्रकल्पासाठी जंगलतोडीला केंद्र सरकारची मंजुरी
राजा-सोनमनंतर आणखी एक नवविवाहित जोडपं बेपत्ता, सिक्कीमला हनिमूला गेले ते परतलेच नाही
विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ बनवून युट्यूबवर केला अपलोड, बाप-लेकाला बेड्या
Pandharpur News – आषाढीवारीच्या पार्श्वभूमीवर 27 जूनपासून श्री विठ्ठल मंदिर 24 तास खुले राहणार
Mumbai News – माटुंग्यात भररस्त्यात चौघांवर प्राणघातक हल्ला, घटना सीसीटीव्हीत कैद
Upcoming IPO: शेअर बाजारात गुंतवणुकीची मोठी संधी, 4 नवीन IPO येतायत; वाचा सविस्तर