Pune News – सुट्टीचा आनंद जीवावर बेतला, लोणावळ्यातील भुशी धरणात बुडून दोघांचा मृत्यू

Pune News – सुट्टीचा आनंद जीवावर बेतला, लोणावळ्यातील भुशी धरणात बुडून दोघांचा मृत्यू

रविवारी सुट्टीनिमित्त मित्रांचा ग्रुप भुशी धरणावर फिरायला गेला होता. यावेळी धरणातील पाणी पाहून त्यांना पोहण्याचा मोह झाला आणि सर्व मित्र पाण्यात उतरले. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने दोघांचा धरणात बुडून मृत्यू झाला. साहिल अश्रफ अली शेख आणि मोहम्मद जमाल अशी बुडून मृत्यू झालेल्या तरुणांची नावे आहेत.

दोघेही तरुण मूळचे उत्तर प्रदेशचे असून कामानिमित्त लोणावळ्यात राहत होते. रविवारी सुट्टी असल्याने सर्व मित्र भुशी धरणावर फिरायला आले होते. यावेळी सर्व मित्र पोहायला धरणात उतरले. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने ते खोल पाण्यात बुडाले. यावेळी इतर मित्रांनी आरडाओरडा केला, मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता.

घटनेची माहिती मिळताच लोणावळा पोलीस, आपत्कालीन पथक आणि शिवदुर्ग टीम घटनास्थळी दाखल झाली. दोघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. याप्रकरणी लोणावळा शहर पोलिसात घटनेची नोंद करण्यात आली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;