डीएमके ED च्या छाप्यांना किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदींना घाबरत नाही – उदयनिधी स्टॅलिन
तमिळनाडूचे उपमुख्यमंत्री आणि द्रविड मुन्नेत्र कळघमचे (DMK) नेते उदयनिधी स्टॅलिन यांनी शनिवारी केंद्र सरकार आणि अंमलबजावणी संचालनालयाला (ED) थेट आव्हान देत म्हटले की, “डीएमके ईडीच्या छाप्यांना किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदींना घाबरत नाही. पक्ष कायदेशीररित्या खटल्यांना तोंड देईल. द्रमुक सरकार राज्याच्या हक्कांसाठी आवाज उठवत राहील आणि कोणत्याही धमक्यांना घाबरणार नाही.” तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांच्या दिल्ली दौऱ्यावरून विरोधी पक्ष एआयएडीएमकेने केलेल्या टीकेला उत्तर देताना उदयनिधी असं म्हणाले आहेत.
मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी तीन वर्षांनंतर प्रथमच नीती आयोगाच्या बैठकीला हजेरी लावली आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा केली. यावर एआयएडीएमके नेत्यांनी आरोप केला की, तमिळनाडू राज्य मार्केटिंग कॉर्पोरेशनच्या (TASMAC) कार्यालयांवर ईडीच्या छाप्यांमुळे घाबरून स्टॅलिन यांनी दिल्लीचा दौरा केला. याला प्रत्युत्तर देताना उदयनिधी यांनी पत्रकार परिषद घेत सांगितलं की, “आम्हाला ईडी किंवा पंतप्रधान मोदी यांची भीती नाही. डीएमके हा पेरियार यांच्या तत्त्वांवर आधारित स्वाभिमानी पक्ष आहे.”
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List