विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ बनवून युट्यूबवर केला अपलोड, बाप-लेकाला बेड्या

विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ बनवून युट्यूबवर केला अपलोड, बाप-लेकाला बेड्या

पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेले नौदलाचे अधिकारी विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ बनवून व्हायरल केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पिता-पुत्राला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. हरियाणा पोलिसांनी बिहारमधून आरोपीच्या मुसक्या आवळल्या. मोहिबुल हक आणि गुलाब जिलानी अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

आरोपींनी चेहरा मॉर्फ करुन नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील व्हिडिओ बनवला. हा व्हिडिओ एसएस रियल पॉईंट नावाच्या युट्यूब अकाऊंटवर अपलोड केला. याप्रकरणी गुरुग्राम सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी तांत्रिक मदतीने आरोपींचा शोध घेत बिहारच्या गोपालगंज पोलिसांच्या मदतीने आरोपींची गठडी वळली.

पोलीस चौकशीत आरोपींनी याआधीही असे व्हिडिओ बनवून युट्यूबवर अपलोड केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी आणखी आरोपींचा सहभाग आहे का याबाबत पोलीस तपास करत आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;