बिहारमध्ये चिराग पासवान स्वबळावर, एनडीएत पहिली बंडखोरी

बिहारमध्ये चिराग पासवान स्वबळावर, एनडीएत पहिली बंडखोरी

ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये बिहार विधानसभा निवडणुका होण्याची शक्यता असून त्यादृष्टीने जोरदार तयारी सुरू झाली आहे. अशातच एनडीएत पहिली बंडखोरी झाल्याचे समोर आले आहे. सर्वांना सोबत घेऊन जाण्याची भाजपची तारेवरची कसरत सुरू असतानाच एनडीएतील एक मित्रपक्ष लोक जनशक्ती पार्टीचे अध्यक्ष चिराग पासवान यांनी आज स्वबळावर लढण्याची मोठी घोषणा केली.

विधानसभा निवडणुकीत आपला पक्ष सर्वच्या सर्व 243 जागा लढणार असल्याचे चिराग पासवान यांनी जाहीर केले आहे. भोजपूरमध्ये एका सभेत त्यांनी ही घोषणा केली. बिहारला बिहारी फर्स्ट बनवण्यासाठी लढणार आहे. आपला पक्ष बिहारसाठी नाही तर बिहारींसाठी मैदानात उतरणार आहे, असेही त्यांनी म्हटले आहे. गेल्या निवडणुकीतही पासवान यांनी मोदींचे हनुमान असल्याचे सांगत स्वतंत्र निवडणूक लढवली होती.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;