Pandharpur News – आषाढीवारीच्या पार्श्वभूमीवर 27 जूनपासून श्री विठ्ठल मंदिर 24 तास खुले राहणार

Pandharpur News – आषाढीवारीच्या पार्श्वभूमीवर 27 जूनपासून श्री विठ्ठल मंदिर 24 तास खुले राहणार

आषाढी यात्रा कालावधीत श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक येतात. या आषाढी यात्रा कालावधीत येणाऱ्या भाविकांना मंदिर समितीमार्फत मुबलक सोयी सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे. तसेच भाविकांचे सुलभ व जलद दर्शन व्हावे यासाठी 27 जूनपासून 24 तास दर्शन व्यवस्था उपलब्ध होणार असल्याची माहिती मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली.

6 जुलै रोजी आषाढी एकादशी आहे. तर 26 जूनपासून आषाढीवारीला प्रारंभ होत आहेत. आषाढीवारीच्या अनुषंगाने मंदिर समितीची बैठक सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या अध्यक्षतेखाली श्री विठ्ठल रूक्मिणी भक्तनिवास येथे संपन्न झाली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर व परिवार देवता मंदिर जतन व संवर्धन आराखड्यांचा कामाचा आढावा या बैठकीत घेण्यात आला. वारीच्या पार्श्वभूमीवर मंदिर जतन व संवर्धनाची सध्या सुरू असलेली सर्व कामे अंतिम टप्प्यात असून, टोकन दर्शन प्रणालीची 15 जून रोजी पहिली चाचणी घेण्यात येणार आहे.

तसेच आषाढी यात्रेत भाविकांना सुलभ व जलद दर्शन उपलब्ध करून देण्यावर मंदिर समितीचा भर राहणार आहे. दर्शनरांगेत बॅरीकेटींग करून वॉटरप्रुफ मंडप, 4+6 पत्राशेड, विश्रांती कक्ष, फॅब्रिकेटेड शौचालये, लाईव्ह दर्शन, कुलर फॅन, सार्वजनिक सूचना प्रणाली, मिनरल वॉटर, सुरक्षा रक्षक नियुक्ती, आपत्कालिन सुविधा, चहा खिचडी वाटप, आरोग्य व्यवस्थेचे स्टॉल, 24 तास अन्नछत्र, बँग स्कॅनर मशिन, हिरकणी कक्ष, नदीपात्रात चेंजिंग रूम इत्यादी स्वरूपाच्या सोई सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी सांगितले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;