EC ने जाहीर करण्याआधीच भाजप आयटी सेलला निवडणुकीची तारीख माहित असते, तेजस्वी यादव यांचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल

EC ने जाहीर करण्याआधीच भाजप आयटी सेलला निवडणुकीची तारीख माहित असते, तेजस्वी यादव यांचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल

राष्ट्रीय जनता दलाचे (RJD) नेते आणि बिहार विधानसभेतील विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या निवडणूक आयोगावरील (ECI) गंभीर आरोपांना पाठिंबा दर्शवला आहे. त्यांनी केंद्रातील भाजपा सरकारवर हल्लाबोल करताना म्हटले आहे की, 2014 पासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने सर्व संवैधानिक संस्थांचे “अपहरण” केले आहे. विशेषत: निवडणूक आयोगावर निशाणा साधताना तेजस्वी यांनी दावा केला की, “निवडणूक आयोगाने निवडणूक तारखा जाहीर करण्यापूर्वीच भाजपाच्या आयटी सेलला त्या माहिती असतात.” माध्यमांशी संवाद साधताना ते असं म्हणाले आहेत.

राहुल गांधी यांनी अलीकडेच एका लेखात 2024 च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ‘मॅच फिक्सिंग’ झाल्याचा आरोप केला होता. त्यांनी निवडणूक प्रक्रियेत अनियमितता असल्याचा दावा केला, ज्यामध्ये बनावट मतदार यादी तयार करणे, मतमोजणीला उशीर करणे आणि पुरावे लपवणे यांचा समावेश आहे. राहुल यांनी म्हटले की, हीच पद्धत आता बिहारसह इतर राज्यांमध्ये, जिथे भाजपा कमकुवत आहे, तिथे वापरली जाऊ शकते.

तेजस्वी यादव यांनी राहुल गांधी यांच्या या दाव्यांना पाठिंबा देताना 2020 च्या बिहार विधानसभा निवडणुकीचा दाखला दिला. ते म्हणाले की, “2020 च्या निवडणुकीत मतमोजणी संध्याकाळी थांबवण्यात आली आणि रात्री पुन्हा सुरू झाली. जे उमेदवार विजयी घोषित झाले होते, त्यांना नंतर पराभूत घोषित करण्यात आले.” त्यांनी निवडणूक आयोगाच्या या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत म्हटले की, “आयोगाने पारदर्शकपणे आणि निष्पक्षपणे काम करणे आवश्यक आहे. जर संवैधानिक संस्था प्रभावाखाली काम करत असतील, तर न्याय मिळणे अशक्य आहे.”

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;