राजा-सोनमनंतर आणखी एक नवविवाहित जोडपं बेपत्ता, सिक्कीमला हनिमूला गेले ते परतलेच नाही

राजा-सोनमनंतर आणखी एक नवविवाहित जोडपं बेपत्ता, सिक्कीमला हनिमूला गेले ते परतलेच नाही

इंदूरचे नवविवाहित जोडपे राजा-सोनम प्रकरण ताजे असतानाच आता आणखी एक जोडपं बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेशातील एक नवविवाहित जोडपं सिक्कीमला हनिमूनला गेलं ते परतलंच नाही. कौशलेंद्र सिंह आणि अंकिता सिंह अशी या जोडप्याची नावे आहेत. कौशलेंद्र आणि अंकिता 24 मे रोजी सिक्कीमला हनिमूनला गेले. त्यानंतर 29 मे रोजी त्यांच्या वाहनाचा अपघात झाला आणि तेव्हापासून ते बेपत्ता आहेत.

कौशलेंद्र आणि अंकिता उत्तर प्रदेशातील प्रतापगढ जिल्ह्यातील रहाटीकर गावातील रहिवासी असून 5 मे रोजी त्यांचा विवाह झाला. नवविवाहित जोडपं 24 मे रोजी सिक्कीमला हनिमूनसाठी गेले. त्यानंतर 29 मे रोजी संध्याकाळी ते प्रवास करत असलेली ट्रॅव्हलर व्हॅन मगन जिल्ह्यात 1000 फूट दरीत कोसळली. अपघातात व्हॅनमधील एकाचा मृत्यू झाला आणि दोन जण जखमी झाले. तर नवविवाहित जोडप्यासह अन्य आठ जण नदीत वाहून गेले.

अपघातानंतर एनडीआरएफकडून सर्च ऑपरेशन सुरू आहे. मात्र आठ दिवस उलटले तरी अद्याप कौशलेंद्र आणि अंकिताचा शोध लागला नाही. कौशलेंद्रचे कुटुंब त्यांचा शोध घेण्यासाठी सिक्कीमला दाखल झाले. सर्च ऑपरेशन वेगाने सुरू करावं, असं आवाहन सिंह कुटुंबीयांनी उत्तर प्रदेश आणि सिक्कीमला सरकारला केलं आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;