‘एचएसआरपी’ ला वाहनचालकांचा अल्प प्रतिसाद; 30 जून शेवटची तारीख, 16 जूनपासून इतर कामांना ब्रेक

‘एचएसआरपी’ ला वाहनचालकांचा अल्प प्रतिसाद; 30 जून शेवटची तारीख, 16 जूनपासून इतर कामांना ब्रेक

उच्च सुरक्षा वाहन क्रमांक (एचएसआरपी) बसवण्यासाठी 30 जून शेवटची दिनांक आहे. परंतु, अजूनही एचएसआरपीला वाहनचालकांचा अल्प प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येते. एचएसआरपी बसवण्याच्या कामाध्ये गती येण्यासाठी परिवहन विभागाने आता 1 एप्रिल 2019 पूर्वीच्या वाहनांचे हस्तांतरण, नोंदणी प्रमाणपत्रामध्ये पत्ता बदल यांसह विविध कामांना ब्रेक लावण्याचा निर्णय घेतला आहे.

परिवहन विभागाने राज्यातील 1 एप्रिल 2019 पूर्वीच्या जुन्या वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट एचएसआरपी बसवून घेणे बंधनकारक केले आहे. यासाठी तीन खासगी कंपन्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 1 जानेवारीपासून एचएसआरपी नंबर प्लेट बसवण्यास सुरुवात झाली आहे. सातारा प्रादेशिक परिवहन विभागात 4 लाख 70 हजार 797 वाहने आहेत. त्यापैकी आतापर्यंत 79 हजार 877 दुचाकी, 1 हजार 216 तीन चाकी, 22 हजार 5 चारचाकी, 4 हजार 645 इतर वाहने, अशी मिळून 1 लाख 7 हजार 750 वाहनांनी एचएसआरपी नंबर प्लेट बसवल्याचे प्रादेशिक परिवहन अधिकारी दशरथ वाबुले यांनी सांगितले.

फलटण उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात 83 हजार 803 वाहने आहेत. त्यापैकी आतापर्यंत 11 हजार 877 दुचाकी, तीन चाकी 56, चारचाकी 6 हजार 151, इतर वाहने 926, अशी मिळून 19 हजार 10 वाहनांनी एचएसआरपी नंबर प्लेट बसवली असल्याची माहिती सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी संदीप म्हेत्रे यांनी दिली.

राज्यात सर्वच आरटीओंत एचएसआरपी नंबर प्लेट बसवण्याच्या कामामध्ये गती येण्यासाठी उपाययोजना सुरू केल्या आहेत. यामध्ये 1 एप्रिल 2019 पूर्वीच्या वाहनांचे हस्तांतरण, नोंदणी प्रमाणपत्रामध्ये पत्ता बदल करणे, वित्त बोजा चढवणे, उतरवणे, दुय्यम नोंदणी प्रमाणपत्र देणे, ना हरकत प्रमाणपत्र जारी करणे, वाहनांमध्ये बदल करणे, आदी वाहनविषयक सर्व कामकाज एचएसआरपी नंबर प्लेट बसवल्याशिवाय 16 जूनपासून बंद करण्यात येणार आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

फॅक्ट की मिथ? एकत्र राहणाऱ्या मुलींचे मासिक पाळीची सायकसही एकसारखीच होते? विज्ञान काय म्हणते? फॅक्ट की मिथ? एकत्र राहणाऱ्या मुलींचे मासिक पाळीची सायकसही एकसारखीच होते? विज्ञान काय म्हणते?
मासिक पाळीबाबत तसे अनेक समज गैरसमज आपण ऐकत आलो आहोत. आई-ताई-आजी किंवा अजून कोणी मोठ्यांनी सांगितलेल्या बऱ्याच गोष्टी आपण ऐकतो...
वारंवार लघवीला लागणे हे कोणत्या आजाराचे लक्षण आहे? दुर्लक्ष करू नका अन्यथा…
देवेंद्र फडणवीसांनी निवडणूक आयोगाची वकिली करू नये, आयोगाने खुलासा करावा – नाना पटोले
राहुल गांधींनी आयोगाला विचारलेल्या प्रश्नांना भाजपकडून उत्तरे म्हणजे मॅच फिक्सिंगवर शिक्कामोर्तबच – रमेश चेन्नीथला
स्कूबा डायव्हिंग करताना श्वास कोंडला, हृदयविकाराच्या झटक्याने हिंदुस्थानी अभियंत्याचा दुबईत मृत्यू
मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार उफाळला! आंदोलकांचा आत्मदहनाचा प्रयत्न, अनेक जिल्ह्यांमध्ये संचारबंदी लागू
या तीन फळांचा ज्यूस चुकूनही पिऊ नका, आरोग्य सुधारण्याऐवजी बिघडेल