स्कूबा डायव्हिंग करताना श्वास कोंडला, हृदयविकाराच्या झटक्याने हिंदुस्थानी अभियंत्याचा दुबईत मृत्यू

स्कूबा डायव्हिंग करताना श्वास कोंडला, हृदयविकाराच्या झटक्याने हिंदुस्थानी अभियंत्याचा दुबईत मृत्यू

स्कूबा डायव्हिंगदरम्यान श्वास घेण्यास त्रास झाल्याने हृदयविकाराचा झटका येऊन 29 वर्षीय हिंदुस्थानी अभियंत्याचा दुबईत मृत्यू झाला. इसाक पॉल ओलाक्केनगिल असे मयत अभियंत्याचे नाव आहे. इसाक हा मूळचा केरळचा रहिवासी असून नोकरीनिमित्त दुबईत राहत होता.

ईद अल-अधाची सुट्टी असल्याने इसाक दुबईच्या जुमेराह बीचवर स्कूबा डायव्हिंगचे प्रशिक्षण घेण्यासाठी गेला. स्कूबा डायव्हिंगचे प्रशिक्षण घेत असताना इसाकला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला आणि तो ग्रुपपासून वेगळा झाला. इसाकला तात्काळ पाण्याबाहेर काढत जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. मात्र त्याचा मृत्यू झाला.

इसाकचा मृतदेह हिंदुस्थानात आणण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांशी समन्वय साधत असल्याचे इसाकचे काका डेव्हिड प्यारीलोस यांनी सांगितले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;