मराठी साहित्य संमेलन साताऱ्यात, तब्बल 32 वर्षांनी मिळाला बहुमान

मराठी साहित्य संमेलन साताऱ्यात, तब्बल 32 वर्षांनी मिळाला बहुमान

99वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन तब्बल 32 वर्षांनी साताऱ्याला होणार आहे. साहित्य संमेलन आयोजित करण्याचा मान साताऱयातील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शाहूपुरी शाखेला आणि मावळा फाऊंडेशनला मिळाला आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या पुणे येथे झालेल्या बैठकीत हा निर्णय एकमताने घेण्यात आला.

पुणे येथे रविवारी साहित्य महामंडळाची बैठक झाली. बैठकीला साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, उपाध्यक्ष गुरुय्या स्वामी, कार्यवाह सुनीताराजे पवार, कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी यांच्यासह सर्व घटक, समाविष्ट आणि संलग्न संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. 99 व्या साहित्य संमेलनाचे स्थळ निश्चित करण्यासाठी स्थळ निवड समिती गठीत करण्यात आली होती. या समितीने 5 ते 7 जूनदरम्यान निमंत्रक संस्थांना भेट दिली. संमेलनासाठी सदानंद साहित्य मंडळ, औदुंबर, महाराष्ट्र साहित्य परिषद, शाखा इचलकरंजी, दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा, कोल्हापूर आणि महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा शाहूपुरी सातारा या संस्थांकडून निमंत्रणे आली होती. या स्थळांना भेटी दिल्यानंतर स्थळ निवड समितीची बैठक रविवारी झाली. बैठकीत साताऱ्याला साहित्य संमेलन घेण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला. या निर्णयावर महामंडळाने एकमताने शिक्कामोर्तब केले.

  • साताऱ्यात होणारे हे चौथे संमेलन आहे. 1878 मध्ये लोकहितवादी आणि न्यायमूर्ती रानडे यांनी ग्रंथकार संमेलन सुरू केल्यानंतर तिसरे संमेलन 1905 साली रघुनाथ पांडुरंग करंदीकर यांच्या अध्यक्षतेखाली साताऱयात झाले होते. 1962 मध्ये न. वि. गाडगीळ यांच्या अध्यक्षतेखाली 44 वे तर 1993 साली विद्याधर गोखले यांच्या अध्यक्षतेखाली 66 वे साहित्य संमेलन झाले होते.
  • नियोजित संमेलन स्थळ छत्रपती शाहू स्टेडियम हे आहे. 1993 साली 66 वे संमेलन इथेच झाले होते. हे स्टेडियम 14 एकरात असून तिथे मुख्य मंडप, दोन इतर मंडप, ग्रंथ प्रदर्शन, कवी गझल कट्टा, तसेच भोजन व्यवस्था करण्यात येणार आहे. येथे तीन सभागृहेही उपलब्ध आहेत. स्टेडियममध्ये 25 हजार प्रेक्षक क्षमतेची गॅलरी आहे.
  • साताऱ्याला 32 वर्षांनंतर मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजनाचा मान मिळाला आहे. यापूर्वी 1993 साली साताऱयात साहित्य संमेलन झाले होते. गेल्या 12 वर्षांपासून साहित्य परिषदेची शाहूपुरी शाखा यासाठी पाठपुरावा करत होती.
Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;