Rinku Singh Priya Saroj – युरोपियन ते चायनीज; खायला सगळं मिळणार, पण फक्त ‘व्हेज’, रिंकू सिंहच्या साखरपुड्याचा मेन्यू व्हायरल
टीम इंडियाचा स्टार क्रिकेट खेळाडू आणि समाजवादी पक्षाच्या खासदार प्रिया सरोज यांचा आज साखरपुडा आहे. लखनऊमधील फाईव्ह स्टार हॉटेल द सेंट्रममध्ये हा सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्यासाठी माजी क्रिकेटपटू प्रवीण कुमार, पीयूष चालला, उत्तर प्रदेशच्या रणजी संघाचा कर्णधार आर्यन जुयाल हे हॉटेलमध्ये पोहोचले आहेत. रिंकूही शनिवारी रात्रीच हॉटेलमध्ये पोहोचला असून रात्री केकही कापण्यात आला.
सेंट्रल हॉटेलमध्ये होणाऱ्या या साखरपुड्यासाठी 15 खोल्या बूक करण्यात आल्या आहेत. यातील 5 खोल्या रिंकूच्या मित्रांसाठी रिझर्व्ह ठेवण्यात आल्या आहेत. अखिलेश यादव, डिंपल यादव, प्रिया सरोज यांची मैत्रिण इकरा हसन यांच्यासह 300 हून अधिक व्हिआयपी पाहूणे या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे सुरक्षा व्यवस्थाही कडेकोट ठेवण्यात आली आहे. व्हिआयपींसाठी विशेष पास बनवण्यात आले असून यात बारकोट स्कॅनिंग सिस्टीम लावण्यात आली आहे.
रिंकू सिंह आणि प्रिया सरोज यांच्या साखरपुड्यासाठी खास 12 बाय 16 फुटांचे स्टेजही बनवण्यात आले आहे. तसेच साखरपुड्यातील मेन्यूही समोर आला आहे. सोहळ्यात लखनवी पदार्थांची रेलचेल असणार असून रिंकू-प्रिया यांच्या आवडीच्या डिशही असणार आहेत.
हॉटेलचे शेफ आशीश शाही यांनी सांगितले की, मेन्यूमध्ये फक्त शाकाहारी जेवण असणार आहे. आमचा मुख्य भर हा अवधी जेवणावर असून लाईव्ह काऊंटवर वेलकम ड्रिंक्स मिळतील. स्टार्टर्समध्ये युरोपियन, चायनीज, आशियाई आणि इंडियन खाद्यपदार्थांचाही समावेश असणार आहे. मुख्य जेवणही हिंदुस्थानी पद्धतीचे असणार असून यात गुलाबाची थंड खीर, आचारी सिगार रोल या पदार्थांचा समावेश असणार आहे.
मुख्य जेवणात मलाई कोफ्ता, कढई पनीर, मिक्स व्हेज भाजी असणार आहे. चायनीज स्टार्टरमध्ये मंचुरियन स्प्रिंग रोलसह अनेक खाद्यपदार्थ असतील, मेन कोर्समध्ये चायनीज नुडल्सचा समावेश असणार आहे. पाहुण्यांना कुहाडा हे नाराळापासून बनवण्यात येणारे पेय दिले जाईल.
दरम्यान, याच वर्षी जानेवारी महिन्यात रिंकू आणि प्रिया सरोज यांचे लग्न पक्के झाले होते आणि सुपारी फुटली होती. त्यानंतर लग्नाची तारीख देखील निश्चित झाली. 8 जून रोजी दोघांचा साखरपुडा, तर 18 नोव्हेंबर रोजी लग्न होईल.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List