चिखलाने माखलेले कपडे आरोपीपर्यंत घेऊन गेले

चिखलाने माखलेले कपडे आरोपीपर्यंत घेऊन गेले

शिवडी येथे एका महिलेची हत्या करून पसार झालेल्या आरोपीला अखेर पोलिसांनी पकडले. काळोखाचा फायदा घेत आरोपी सटकला, पण त्याचे चिखलाने माखलेले कपडे पोलिसांच्या पथ्यावर पडले आणि आरोपीला शिवडी येथून अटक झाली.

बुधवारी रात्री आरोपी चंदन आणि हसिना यांच्यात बीडीडी चाळ क्रमांक 9 येथे वाद झाला. त्यावेळी हसिना ही दारूच्या नशेत तर्रर होती. तिने नशेतच चंदनच्या तोंडावर मारले. परिणामी चंदनच्या जिभेला दुखापत झाली. यामुळे संतापलेल्या चंदनने हसिनाला बेदम मारहाण केली. या मारहाणीत नशेत असलेल्या हसिनाचा मृत्यू झाला.

या प्रकरणी रफी अहमद किडवाई मार्ग पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध सुरू केला, पण घटनास्थळी सीसीटीव्ही नसल्याने आरोपीची ओळख पटणे अशक्य होते. दरम्यान, रात्री 11.30 वाजण्याच्या सुमारास एक व्यक्ती शिवडी स्थानकात दिसला. तो जरा सैरावैरा झाला होता आणि त्याचे कपडे चिखलाने माखलेले होते, अशी माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी त्याचा शोध घेऊन आरोपीला अटक केली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;