दीपिका, कतरिना, प्रियांका चोप्राही ठरली अपयशी! रातोरात तमन्ना भाटियाच्या पदरात आले 6.2 कोटी, वाचा

दीपिका, कतरिना, प्रियांका चोप्राही ठरली अपयशी! रातोरात तमन्ना भाटियाच्या पदरात आले 6.2 कोटी, वाचा

तमन्ना भाटियाची ओळख ही मिल्की ब्युटी अशी दक्षिणेकडे सर्वज्ञात आहे. सध्याच्या घडीला तमन्नाचे नशिब पालटले असून, तिच्या समोर आता दीपिका, कतरिनाही फिक्या पडतील असा सौदा तिच्या पदरात पडला आहे. कर्नाटक सरकारने तमन्ना भाटिया हिला आता म्हैसूर सँडल सोपची ब्रँड अॅम्बेसेडर बनवले आहे. विशेष म्हणजे हा साबण नवीन नाही तर वर्षानुवर्षे जुना आहे.

हिंदुस्तान टाईम्समध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार, हा साबण 1916 पासून तयार केला जात आहे. 1900 च्या दशकाच्या सुरुवातीला म्हैसूरचे राजा कृष्ण राजा वाडियार चतुर्थ यांनी बेंगळुरूमध्ये सरकारी साबण कारखाना स्थापन केला होता. कर्नाटक सोप्स अँड डिटर्जंट्स लिमिटेड (केएसडीएल) द्वारे उत्पादित, हा साबण कर्नाटकात सांस्कृतिक महत्त्व अबाधित आहे. तमन्ना भाटिया आता या साबणासाठी ब्रॅंड अॅम्बेसिडर बनली आहे.

यातील महत्त्वाची मेख म्हणजे, हा सौदा आजच्या घडीचा सर्वात महागडा सौदा मानला जात आहे. हा करार 2 वर्षे आणि 2 दिवसांसाठी असून, याकरता तमन्नाला सर्वाधिक 6.2 कोटी रुपये मिळणार आहेत. कर्नाटक सरकारने याबाबत अधिसूचनाही जारी केली. ही सूचना व्हायरल होताच लोकांनी कर्नाटक सरकारच्या या निर्णयावर प्रश्न उपस्थित करण्यास सुरुवात केली.

लोक म्हणाले की, यासाठी एखाद्या कन्नड अभिनेत्याला का घेतले नाही. यावर उत्तर देताना, राज्याचे वाणिज्य आणि उद्योगमंत्री एमबी पाटील यांनी म्हटले की, ‘कर्नाटक सोप्स अँड डिटर्जंट्स लिमिटेड कन्नड चित्रपट उद्योगाचा आदर करते. काही कन्नड चित्रपटही बॉलिवूड चित्रपटांना जोरदार टक्कर देत आहेत. म्हैसूर सँडल साबण हा कर्नाटकातील एक उत्तम ब्रँड आहे. या साबणाचे लक्ष्य कर्नाटकाबाहेरील बाजारपेठेत प्रवेश करणे आहे. बाजारातील तज्ज्ञांशी बराच विचारविनिमय केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. “दीपिका पदुकोण, रश्मिका मंदान्ना, पूजा हेगडे आणि कियारा अडवाणी यासारख्या इतर प्रमुख सेलिब्रिटींचाही विचार करण्यात आला होता. परंतु तमन्नाचे सोशल मीडियावरील फाॅलोवर्स पाहता, तसेच इतर अनेक गोष्टींचा विचार करुनच तमन्नाची निवड करण्यात आली आहे.

 

विजय वर्मा आणि तमन्ना भाटिया यांचे ब्रेकअप! वाचा प्रेमापासून ते ब्रेकअप पर्यंतचा प्रवास

तमन्नाची संपूर्ण हिंदुस्थानातील मूल्यांकन पाहूनच तिची निवड झालेली आहे. केएसडीएलचे 2030 पर्यंत 5 हजार कोटी रुपयांची विक्री करण्याचे लक्ष्य आहे आणि या संदर्भात एक मजबूत मार्केटिंग धोरण महत्त्वाचे ठरते. मार्केटिंग तज्ञांच्या शिफारशींवरून ही नियुक्ती करण्यात आली आहे.” अशीही माहिती यावेळी एमबी पाटील यांनी दिली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मुंबईकर आज पाहणार समुद्राचं रौद्ररूप; मुंबईत अतिमुसळधार पावसाचा इशारा मुंबईकर आज पाहणार समुद्राचं रौद्ररूप; मुंबईत अतिमुसळधार पावसाचा इशारा
राज्यात अवकाळी पावसाचा कहर सुरूच आहे,  अवकाळी पावसानं महाराष्ट्राला झोडपून काढलं आहे. राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस सुरू...
‘रात्री 8 वाजता मी दारूची बाटली उघडते अन्…’ गोविंदाची पत्नी सुनिता दारूसाठी वेडी का आहे? तिनेच सांगितलं कारण
Hair Care- केस गळतीमुळे त्रस्त आहात का? या सहा उपायांनी तुमच्या केसांना द्या नवसंजीवनी
Vaishnavi Hagavane case – राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणेला 28 मे पर्यंत पोलीस कोठडी
Nanded News – गाडीवर पोलीस व पत्रकार बोर्ड लावून गोवंश चोरी करण्याचा प्रयत्न; सहा जणांना अटक
आरक्षित सरकारी जमीन राहू-केतूंनी हडपली! हिंमत असेल तर आव्हान स्वीकारा; अनिल गोटेंचा मुख्यमंत्री फडणवीस आणि बावनकुळेंना इशारा
हिंदुस्थानात कोरोना रुग्णांचा आकडा चढाच! महाराष्ट्रात 100 नव्या रुग्णांची नोंद