शिंदेंचे विमान उडवण्यास पायलटचा नकार, जळगाव विमानतळावर गोंधळ

शिंदेंचे विमान उडवण्यास पायलटचा नकार, जळगाव विमानतळावर गोंधळ

सलग डय़ुटी आणि तब्येतीच्या कारणास्तव उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विमान उडवण्यास पायलटने नकार दिला आणि जळगाव विमानतळावर बराचवेळ नाटय़ घडले. दरम्यान, नंतर त्याच पायलटने हे विमान मुंबईला आणले.

शिंदे जळगाव येथून मुंबईला येणार होते. मात्र, ऐनवेळी पायलटने विमान उड्डाणास नकार दिला. 12 तासांहून अधिक डय़ुटी झाल्याने तसेच तब्येत बरी नसल्याने मला विमान नेणे शक्य नाही, असे त्याने सांगितले. त्यामुळे शिंदे आणि त्यांचा लवाजमा अडकून पडला. त्यानंतर मंत्री गिरीश महाजन आणि गुलाबराव पाटील तिथे पोहोचले. ते विमान कंपनीशी बोलले. पायलटची डॉक्टरांकडून तपासणी करण्यात आली. डय़ुटी संपलेली असल्याने नव्याने परवानगी घेण्यात आली. त्यानंतरच त्याच पायलटसह विमान निघाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;