भरपावसात शिवसैनिक मदतीला धावले, पाहा Photo
मुंबईत सोमवारी झालेल्या अतिवृष्टीवेळी संकटात सापडलेल्या मुंबईकरांना मदत करा, असे आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले. त्या पार्श्वभूमीवर शिवसैनिक भरपावसात मुंबईकरांच्या मदतीला धावून गेले. शिवसैनिकांनी कुठे साफसफाई, स्वच्छता मोहीम राबवली तर कुठे नालेसफाई करून पाण्याचा निचरा करण्यात मदत केली तर कुठे खचलेला रस्ता दुरुस्त करून घेतला.
वांद्रे येथे नालेसफाई
शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांच्या सूचनेनुसार, मुंबईत होत असलेल्या अतिवृष्टीवेळी वांद्रे येथे नालेसफाई करून साचलेल्या पाण्याचा निचरा करण्यात आला. यावेळी माजी नगरसेवक, विधानसभा समन्वयक चंद्रशेखर वायंगणकर, शाखाप्रमुख वसंत गावडे, शिवसैनिक, स्थानिक रहिवासी तसेच पालिका कर्मचारी उपस्थित होते.
कांदिवलीत रस्ता केला दुरुस्त
शिवसेना शाखा क्रमांक 22 रामपृष्ण शाळेच्या मागे तुळस्करवाडी येथे बिल्डरच्या वाहनांमुळे खचलेला रस्ता शिवसैनिकांनी दुरुस्त केला. यावेळी विधानसभाप्रमुख संतोष राणे, प्रदीप वस्त, आशीष पाटील, प्रसाद पाटील, राजपुमार पवार, रेखा कदम, छाया डोयले, नरेंद्र जयवंत उपस्थित होते.
घाटकोपरमध्ये स्वच्छता मोहीम
ईशान्य मुंबई विभागप्रमुख सुरेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली घाटकोपर पूर्वमधील राजावाडी परिसरातील गटारांची शिवसैनिकांकडून स्वच्छता करून घेतली. यावेळी शिव आरोग्य सेनेचे मुंबई समन्वयक प्रकाश वाणी, विधानसभा संघटक सचिन भांगे, चंद्रकांत हळदणकर आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List