Pune News – पुण्यात पुन्हा कोयता गँगची दहशत, भररस्त्यात तरुणावर हल्ला; घटना सीसीटीव्हीत कैद

Pune News – पुण्यात पुन्हा कोयता गँगची दहशत, भररस्त्यात तरुणावर हल्ला; घटना सीसीटीव्हीत कैद

पुण्यात पुन्हा कोयता गँग सक्रीय झाली असून बुधवारी दुपारी भररस्त्यात तरुणावर हल्ला करण्यात आला. हल्ल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. दत्तवाडी परिसरात दुपारी दोनच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पुणे पोलीस प्रकरणाचा तपास करीत आहे.

दोन ते तीन जणांच्या टोळीने एका तरुणाचा पाठलाग करत त्याच्यावर कोयत्याने हल्ला केला. या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला असून सध्या त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे. याप्रकरणी दत्तवाडी पोलिसात नोंद करण्यात आली असून, पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;