शेळी पालनाच्या नावाखाली एमडीचा कारखाना, कर्जतच्या सावली फार्म हाऊसवर मुंबई पोलिसांची कारवाई; 12 कोटींचा मुद्देमाल जप्त, एकाला अटक

शेळी पालनाच्या नावाखाली एमडीचा कारखाना, कर्जतच्या सावली फार्म हाऊसवर मुंबई पोलिसांची कारवाई; 12 कोटींचा मुद्देमाल जप्त, एकाला अटक

शेळी पालनाच्या नावाखाली आपण करत असलेल्या एमडी बनविण्याच्या गोरखधंद्याबाबत कोणाला समजणार या ड्रग्ज माफियांच्या भ्रमाला मुंबई पोलिसांनी सुरुंग लावला. कर्जतच्या सावली फार्म हाऊसमध्ये अगदी सुमडीत सुरू असलेला एमडी बनविण्याचा कारखाना पोलिसांनी उद्ध्वस्त केला. त्याठिकाणी छापेमारी करून  एमडीसह तब्बल 12 कोटींचा मुद्देमाल जप्त करून  एकाला अटक केली.

मुंबईच्या परिमंडळ-6 अंतर्गत ‘नशामुक्त गोवंडी अभियान’ राबविण्यात येत आहे. त्यासाठी उपायुक्तांचे एक विशेष पथक कार्यरत आहे. सपोनि मैत्रानंद खंदारे, उपनिरीक्षक सुशांत साळवी, गणेश कर्चे, अजय गोल्हार व पथक ड्रग्जविरोधात धडक कारवाया करत आहे. 19 मार्च रोजी या पथकाने आरसीएफ पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका तस्कराला एमडीसह पकडले होते. त्यानंतर त्याच्या चौकशीत अन्य ड्रग्ज तस्करांची नावे समोर आल्यानंतर  पथकाने मुंबई व नवी मुंबईतून आणखी पाच जणांना बेडय़ा ठोकल्या. या सहा जणांकडे पथकाने कसून चौकशी केल्यावर मोठा भंडापह्ड झाला. कर्जतच्या किकवी येथील सावली फार्म हाऊसमध्ये एमडी बनविण्याच्या कारखान्यावर छापा मारला. तिथे शेळी पालनाबरोबरच एमडी बनविण्याचा कारखाना ही सापडला. आढळून आला. तेथे पाच किलो 525 ग्रॅम तयार असलेला एमडी, तसेच एमडी बनविण्यासाठी लागणारा कच्चा माल व इलेक्ट्रिक प्लाण्टचे साहित्य मिळून आले. अशा प्रकारे तेथून 12 कोटी पाच हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून एकाला अटक केली.

व्हॅक्सिन ठेवायच्या नावाने कारखाना

पाहिजे आरोपींपैकी एकाने हा एमडीचा कारखाना थाटला होता. फार्म हाऊसच्या मालकाला शेळी व श्वान पालन करायचे असल्याचे सांगून त्यासाठी भाडेतत्त्वावर फार्म हाऊस घेतले होते. सांगितल्याप्रमाणे त्यांनी शेळी व श्वान पालन सुरूदेखील केले. पण तेथे एका 600 क्षेत्रफळाच्या जागेत गुपचूप कारखाना थाटला. तेथे शेळी व श्वानांना द्यायचे व्हॅक्सिन ठेवले असून तेथे जाण्यास मज्जाव असल्याचे ते सर्वांना सांगायचे. त्यामुळे त्या जागेत नेमके काय चालायचे ते कोणाला समजून येत नव्हते. याचा फायदा घेत ते त्याठिकाणी एमडी बनवीत होते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

काजोल – राणी मुखर्जी यांच्या जवळतच्या व्यक्तीचं निधन, अंत्यदर्शनासाठी सेलिब्रिटींची गर्दी काजोल – राणी मुखर्जी यांच्या जवळतच्या व्यक्तीचं निधन, अंत्यदर्शनासाठी सेलिब्रिटींची गर्दी
अभिनेत्री काजोल आणि राणी मुखर्जी यांचा भाऊ अयान मुखर्जी याचे वडील देब मुखर्जी यांच्या निधनानंतर कुटुंबातील आणखी एका व्यक्तीचं निधन...
वकिलावरच केस फाईल करण्याची वेळ आलीय!; वैष्णवी हगवणेच्या चारित्र्यावर प्रश्न विचारताच अभिनेता संतापला
त्याचं स्तनपान सुटलं..; लिव्हर कॅन्सरशी झुंज देणारी दीपिका मुलाबद्दल बोलताना झाली भावूक
डोळ्यांतून वारंवार पाणी येणं नक्की कोणत्या आजाराचं लक्षण, बिलकूल दुर्लक्ष करू नका
OMAD आहार म्हणजे काय? जाणून घ्या याचे आरोग्यासाठी होणारे फायदे आणि दुष्परिणाम
पीरियडसच्या काळात अशी काळजी घ्या, नाही तर… एक्सपर्टचा विशेष सल्ला काय?
रक्त न काढता करा रक्त तपासणी, AI तंत्रज्ञानामुळे क्रांतिकारी बदल