खराब झालेली चहाची गाळणी स्वच्छ करण्यासाठी या टिप्सचा वापर करावा
आपल्या देशातील 99 टक्के घरामध्ये सकाळची सुरुवात ही चहाने होत असते. हिंदुस्थानातील बहुसंख्य घरांमध्ये चहा पिण्याची तलफ ही सर्वांनाच होत असते. त्यामुळेच आपल्याकडे चहा बनवल्यानंतर भांडी स्वच्छ करणे हे त्रासिक काम असते. विशेषतः चहाचे पातेले धुतले जाते, पण गाळणी मात्र तितकी स्वच्छ धुतली जात नाही. त्यामुळे कालांतराने गाळणीची छिद्रे बंद होतात. अनेकदा गाळणी खराब झाल्यामुळे, ती गाळणी निरुपयोगी म्हणून फेकून दिली जाते. परंतु घरातील जुनी गाळणीही तुम्ही पुन्हा नव्यासारखी चमकवु शकाल. त्याकरता काही सोप्या टिप्सचा वापर करणे गरजेचे आहे.
चहाची गाळणी स्वच्छ करण्यासाठी या टिप्सचा वापर करावा.
सर्वात आधी चहाची गाळणी थेट गॅसच्या आचेवर ठेवा.
यामुळे गाळण्यात अडकलेली घाण जळून जाईल.
गाळणी पूर्णपणे गरम झाल्यानंतर, यातून हलका धूर बाहेर येईल. तेव्हा लगेच गॅस बंद करावा.
गाळणी थंड झाल्यानंतर, डिशवॉश लिक्विड आणि ब्रशच्या मदतीने ती घासून स्वच्छ करा.
असे केल्याने गाळणी पूर्णपणे स्वच्छ आणि चमकदार होईल.
या पद्धतीने आपण फक्त स्टील किंवा लोखंडी गाळणीच स्वच्छ करू शकतो.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List