पिकनिकसाठी गेलेले एकाच कुटुंबातील 18 जण नदीत वाहून गेले, घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

पिकनिकसाठी गेलेले एकाच कुटुंबातील 18 जण नदीत वाहून गेले, घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

पिकनिकसाठी गेलेले एकाच कुटुंबातील 18 जण नदीच्या पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याची घटना समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच बचाव पथकाने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. आतापर्यंत सात जणांचे मृतदेह सापडले असून अन्य लोक अद्याप बेपत्ता आहेत. बेपत्ता लोकांचा शोध सुरू आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील सियालकोट येथील एकाच कुटुंबातील 18 जण शुक्रवारी सकाळी स्वात नदीच्या खोऱ्यात पिकनिकला गेले होते. यावेळी परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस पडल्याने नदीच्या पाणी पातळीत अचानक वाढ झाली. यामुळे नदीला पूर आला आणि पुराच्या पाण्यात 18 जण वाहून गेले. वाहून गेलेल्यांमध्ये लहान मुलं आणि महिलांचा समावेश आहे. पाकिस्तानच्या खैबर-पख्तूनख्वा प्रांतातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ स्वात खोऱ्यात ही घटना घडली. बेपत्ता पर्यटकांचा शोध सुरू आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;