हातचलाखी लपत नसते श्रीमान सीएम जी! वीजदर कमी करण्याची घोषणा फसवी; अंबादास दानवे यांनी केली पोलखोल

हातचलाखी लपत नसते श्रीमान सीएम जी! वीजदर कमी करण्याची घोषणा फसवी; अंबादास दानवे यांनी केली पोलखोल

राज्यातील वीजग्राहकांसाठी वीजदर कमी करण्याची घोषणा करण्यात आली आहे. मात्र, वीजदर कमी करण्याची घोषणा फसवी असून ही हातचलाखी असल्याचे विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी म्हटले आहे. तसेच त्यांनी आकडेवारी जाहीर करत ही हातचलाखी आणि फसवाफसवी उघड करत या घोषणेची पोलखोल केली आहे.

राज्यातील वीज ग्राहकांसाठी वीजदर ठरवण्यासाठी महावितरणने दाखल केलेल्या याचिकेवर महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने निर्णय दिला असून घरगुती, औद्योगिक तसेच व्यावसायिक अशा सर्वच ग्राहकांच्या वीजदरात आगामी पाचही वर्षात कपात करण्याचा आदेश दिला आहे. पहिल्या वर्षी दहा टक्के आणि पुढील पाच वर्षांत सव्वीस टक्क्यांपर्यंत दर कमी होतील. मात्र, हे फसवे असल्याचे दानवे यांनी म्हटले आहे.

दानवे यांनी याबाबत एक्सवर पोस्ट केली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, हातचलाखी! 70 टक्के ग्राहकांचे वीजबिल सरासरी किती आणि उर्वरितांचे किती, हे देखील जाहीर व्हायला हवे. ज्यांची बिल रक्कम जास्त त्यांना हा दिलासा नाही. उलट त्यांना वीज महाग. दिलासा द्यायचा असेलच तर सर्वांना दिला गेला पाहिजे. ही हातचलाखी लपत नसते श्रीमान सीएम जी! यासोबत त्यांनी आधीचे आणि आताचे दर यांची माहिती देत 101 युनीटपेक्षा जास्त वापर असणाऱ्या ग्राहकांचे वीजबिल वाढणार असल्याचे दाखवून दिले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;