पीओपीच्या उंच गणेशमुर्तीचे समुद्रात विसर्जन करण्यावर तुर्तास बंदीच, काकोडकर समितीने सादर केला अहवाल

पीओपीच्या उंच गणेशमुर्तीचे समुद्रात विसर्जन करण्यावर तुर्तास बंदीच, काकोडकर समितीने सादर केला अहवाल

पीओपी मूर्ती विसर्जन आणि पुर्नवापरासाठी राज्य शासनाकडून मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृहा पर्यावरणपूरक सण साजरे करण्यासंदर्भात बैठक पार पडली. पीओपी गणेश मूर्तींच्या विसर्जनासंदर्भात न्यायालयाने दिलेल्या निर्देशांवर सरकारने राजीव गांधी विज्ञान तंत्रज्ञान आयोगाकडून अहवाल मागविला होता. तो अहवाल आज आयोगाचे अध्यक्ष डॉ. अनिल काकोडकर यांनी सादर करत काही शिफारसी केल्या आहेत.

प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या (पीओपी) उंच गणेशमुर्ती तलाव, नद्या आणि समुद्रात विसर्जित करण्यास तूर्त मनाईच करण्यात आली आहे. गणेशोत्सवात भव्य मूर्तींची परंपरा कायम राखायची असेल, तर पर्यावरणपूरक आणि नियोजनबद्ध पर्याय शोधणे अपरिहार्य ठरणार आहे, असा ठळक निष्कर्ष विज्ञान आणि तंत्रज्ञान आयोगाने आपल्या अहवालात नोंदवला आहे.

आयोगाच्या अहवालात काय?

नैसर्गिक जलस्रोतांमध्ये विसर्जनास बंदी कायम
पीओपी मूर्तींचे नैसर्गिक तलाव, नद्या, जलाशयांमध्ये विसर्जन करण्यास उच्च न्यायालयाने स्पष्ट बंदी घातली आहे. त्यामुळे शासकीय परवानगी असूनही मूर्तीचे विसर्जन कुठे करायचे, हा महत्त्वाचा प्रश्न कायम आहे.

प्रदूषणावर सखोल अभ्यास आवश्यक
पीओपी मूर्ती विसर्जनामुळे होणाऱ्या प्रदूषणाचे प्रमाण, पाण्याचा साठा, मूर्तींची संख्या आणि त्यांची रचना यावर विसर्जनाचे परिणाम ठरत असल्याने, सखोल अभ्यासाअभावी तातडीने निर्णय घेणे अशक्य असल्याचे आयोगाचे मत.

तात्पुरत्या उपाययोजना
लहान मूर्तींसाठी कृत्रिम तलावांचा पर्याय, मोठ्या मूर्तींसाठी खोल समुद्र, मोठे जलाशय किंवा नद्यांच्या विसर्गाजवळ, पण मानवी व प्राणी जलवापरापासून सुरक्षित अंतरावर विसर्जन करावे. यासंदर्भात संबंधित संस्थांनी प्रदूषणाचे समग्र मूल्यांकन करावे.

गाळाचे काय करायचे?
पीओपी मूर्तींच्या विसर्जनानंतर तयार होणाऱ्या गाळाचे काय करावे, यावरही आयोगाने स्पष्ट भूमिका घेतली आहे. सध्या तरी गाळ स्वतंत्र साठवावा, आणि तो पुनर्वापरासाठी सखोल अभ्यासाअंती कार्यपद्धती (एसओपी) तयार करूनच वापरावा, अशी सूचना करण्यात आली आहे.

मुर्तींसाठी नैसर्गिक रंगच वापरावेत

– गणेशमुर्ती रंगवण्यासाठी प्रदूषण करणाऱ्या रासायनिक आणि धातूयुक्त रंगांच्या वापरावर बंदी घालावी.
– नैसर्गिक व पर्यावरणस्नेही रंगांचाच मुर्तींसाठी वापर करावा.
– नैसर्गिक रंग कुठे उपलब्ध होतील याबाबत मुर्तीकारांना माहिती दिली जावी.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;