दुचाकीवरून आले अन् धाडधाड गोळ्या झाडून गेले; कुख्यात गँगस्टर जग्गू भगवानपुरीयाच्या आईसह दोघांचा मृत्यू

दुचाकीवरून आले अन् धाडधाड गोळ्या झाडून गेले; कुख्यात गँगस्टर जग्गू भगवानपुरीयाच्या आईसह दोघांचा मृत्यू

पंजाबमध्ये कुख्यात गँगस्टर जग्गू भगवानपुरीया याची आई हरजीत कौर यांची अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली आहे. दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी कौर यांच्यावर धाडधाड गोळीबार केला. यात कौर यांच्यासह त्यांच्या नातेवाईकाचा मृत्यू झाला. करणवीर सिंग असे त्याचे नाव आहे. गुरुवारी रात्री गुरदासपूर जिल्ह्यातील बटाला येथे हा धक्कादायक प्रकार घडला. हा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून यामुळे एकच खळबळ उडाली आहे. गँगस्टर जग्गू भगवानपुरीयाच्या आईच्या निर्घृण हत्येनंतर पंजाबमध्ये पुन्हा एकदा गँगवॉर भडकण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

गुरुवारी रात्री नऊ ते दहाच्या दरम्यान हरजीत कौर अर्बन इस्टेट भागातील आपल्या घराबाहेर स्कॉर्पिओत बसलेल्या होत्या. त्यांच्या शेजारी करणवीर सिंग होता. याचवेळी दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात हल्लेखोरांनी स्कॉर्पिओच्या पुढच्या सीटवर बसलेल्यांवर अंदाधुंद गोळीबार केला आणि पळून गेले. या घटनेमध्ये हरजीत कौर गंभीर जखमी झाल्याने त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती गंभीर असल्याने त्यांना अमृतसरला रेफर करण्यात आले. तिथे उपचारांदरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

दरम्यान, या गोळीबार हरजीत कौर यांचा नातेवाईक करणवीर सिंग याचाही मृत्यू झाला आहे. तो भीखोवाली गावचा रहिवासी होता. पोलिसांनीही याची पुष्टी केली आहे. गोळीबार झाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धावही घेत पंचनामा केला. या प्रकरणी मृताच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून दोन अज्ञात हल्लेखोरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे, अशी माहिती डीएसपी परमवीर सिंग यांनी दिली.

डोन बलने घेतली जबाबदारी

दरम्यान, या हल्ल्याची जबाबदारी बबिबा गँगशी संबंधिक गँगस्टर डोनी बल, बिल्ला मांगा, प्रभू दासूवाल आणि कौशल चौधरी यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत घेतली आहे. गँगस्टर जग्गूचे सर्वकाम करणवीर सिंग सांभाळत होता. त्याची हत्या करून गोरे बरियार याच्या हत्येचा बदला घेतल्याचे त्यांनी म्हटले.

सिलचर तुरुंगात बंद आहे जग्गू

जगदीप सिंग उर्फ जग्गू भगवानपुरीया हा गुरदासपूरचा रहिवासी असून पंजाबचा कुख्यात गँगस्टर आहे. त्याच्या विरोधात हत्या, खंडणी, अंमली पदार्थांची तस्करी, हत्यांची तस्करी, गँगवॉरसह 128 हून अधिक गुन्ह्यांची नोंद आहे. पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला याच्या हत्येवेळी त्याच्या नावाची चर्चा झाली होती. सध्या तो आसामच्या सिलचर तुरुंगात बंद आहे. मार्च 2025 मध्ये बठिंडाच्या तुरुंगातून सिलचर येथे एअरलिफ्ट करण्यात आले होते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;