हिंदी सक्ती विरोधात मुंबईत पुकारण्यात आलेल्या मोर्चाला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा पाठिंबा

हिंदी सक्ती विरोधात मुंबईत पुकारण्यात आलेल्या मोर्चाला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा पाठिंबा

राज्यात पहिलीपासून हिंदी भाषेची सक्ती करण्याचे फर्मान महायुती सरकारने काढले आहे. याविरोधात राज्यभर सुरू असलेल्या आंदोलनांना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), मनसे नंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानेही आपला पाठिंबा दर्शवला आहे.

हिंदी सक्तीविरोधात 5 जुलै रोजी गिरगाव चौपाटी ते आझाद मैदान असा हा मोर्चा निघणार आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षही सहभागी होणार आहे, अशी घोषणा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी एक पत्रक जाहीर करून दिली आहे.

याबाबत पक्षाच्या अधिकृत X अकाऊंटवरून पोस्ट करत सांगण्यात आलं आहे की, “महाराष्ट्र सरकारच्या ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 (NEP २०२०)’ अंतर्गत प्राथमिक शिक्षणात त्रिभाषा सूत्रान्वये केल्या जाणाऱ्या हिंदी सक्तीला विरोध करण्यासाठ आणि प्राथमिक शिक्षण प्रामुख्याने मातृभाषेतूनच व्हावे, या मागणीसाठी येत्या शनिवारी, 5 जुलै 2025 रोजी तमाम मराठीजनांकडून मुंबईत पुकारण्यात आलेल्या मोर्चाला ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार’ पक्षाचा जाहीर पाठिंबा आहे. सर्वांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊयात.”

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;