विमानाच्या पंख्यात गवत अडकले, मुंबई-बँकॉक एअर इंडिया विमानाचे पाच तास उशिराने उड्डाण

विमानाच्या पंख्यात गवत अडकले, मुंबई-बँकॉक एअर इंडिया विमानाचे पाच तास उशिराने उड्डाण

विमानाच्या पंख्यामध्ये गवत अडकल्याने मुंबईहून बँकॉकला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाचे पाच तासाहून अधिक उशिराने उड्डाण झाले. विमानाचे पंख साफ करतानाच विमानतळ कर्मचाऱ्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. विमान खोळंबल्याने प्रवाशांना नाहक त्रास झाला.

एअर इंडियाचे एआय2354 हे विमान नियोजित वेळेनुसार शुक्रवारी सकाळी 7.45 वाजता मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण घेणार होते. मात्र विमानाच्या डाव्या बाजूच्या पंख्यात गवत अडकले होते. यामुळे पाच तासांहून अधिक काळ विमान मुंबई विमानतळावरच थांबवण्यात आले होते. विमानाच्या पंख्यातून गवत साफ केल्यानंतर दुपारी 1 वाजता विमानाने उड्डाण केले.

विमानाच्या पंख्यात समस्या आढळल्यानंतर सर्व प्रवाशांना तात्काळ बाहेर पडण्यास सांगण्यास आले. एअरलाईन कंपनीकडून प्रवाशांना नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली. एअरलाइनने तात्काळ ही समस्या सोडवत विमानाच्या उड्डाणाला परवानगी दिली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;