आंबेगावात बिबट्या मादी आणि बछडा एकाचवेळी पिंजऱ्यात जेरबंद, दुसरा बछडा मोकाट

आंबेगावात बिबट्या मादी आणि बछडा एकाचवेळी पिंजऱ्यात जेरबंद, दुसरा बछडा मोकाट

आंबेगाव तालुक्यातील खडकवाडी, वाळुंजनगर भागात गेल्या तीन महिन्यात बिबट्याने सात जणांना हल्ला केल्याची घटना घडली. परिसरात बिबट्याची दहशत वाढली होती. त्यानंतर बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाने पिंजरा लावला होता. या पिंजऱ्यात शुक्रवारी बिबट्या मादी आणि बछडा एकाचवेळी जेरबंद झाला. तर एक बछडा अजूनही या भागात मोकाट असल्याने बिबट्याची दहशत कायम आहे.

आंबेगाव तालुक्यात माली काही वर्षात बिबट्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे बिबट्या आणि मानवातील संघर्षही वाढत आहे. खडकवाडी, वाळुंजनगर या भागातही बिबट्याचा मुक्त संचार असून तीन महिन्यात येथे बिबट्याने 7 माणसांवर हल्ला केला. 4 मे रोजी वाळुंजनगर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मागील रस्त्यावर जाताना मंगेळ वाळुंज यांच्यावर बिबट्याने हल्ला केला होता. त्यानंतर वनविभागाने शाळेजवळील शेतात पिंजरा लावला होता. 12 जून रोजी या पिंजऱ्यात बिबट्या मादी आणि बछडा जेरबंद झाला. त

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच वनपरिक्षेत्राधिकारी विकास भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल निलम चव्हाण, वनरक्षक योगेश निघोट, रेस्क्यू मेंबर मनोज तळेकर, शीघ्र कृती दल अवसरी/गावडेवाडी मेंबर चारूदत्त बाबळे, धर्मेंद्र ढगे, बापू वाघ, हर्षल गावडे, दीपक भोंडवे, प्रज्वल आवरी, प्रकाश हिले, कुणाल गावडे, ऋषिकेश विधाटे, शुभम शिस्तार, महेंद्र दाते, शुभम येवले यांनी घटनास्थळी धाव घेत बिबट्या मादी व बछड्याला ताब्यात घेऊन अवसरी वन उद्यानात पाठवले आहे.

जुन्नर वन विभागात आज बिबट्या मादी व बछडा एकत्र जेरबंद होण्याची ही पहिलीच घटना असावी. एकाच पिंजऱ्यात एकाच वेळेस एकच बिबट्या अथवा एखादा वन्यप्राणी जेरबंद होत असतो, मात्र या घटनेत मादी व बछडा दोन्ही एकत्र जेरबंद झाल्याने ही घटना दुर्मिळ आहे. या घटनेचा वन्यजीव अभ्यासकांना अभ्यास करण्यासाठीही चांगली पर्वणी असल्याचे उपवनसंरक्षक अमोल सातपुते यांनी सांगितले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;