आंबोली येथे 300 फूट खोल दरीत कोसळला कोल्हापूर येथील पर्यटक

आंबोली येथे 300 फूट खोल दरीत कोसळला कोल्हापूर येथील पर्यटक

सावंतवाडी तालुक्यातील आंबोली येथे वर्षा पर्यटनासाठी आलेल्या कोल्हापूर येथील एका पर्यटकाचा पाय घसरून तो 300 फूट खोल कावळेसाद दरीत कोसळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. राजेंद्र बाळासो सनगर (वय 45, रा. चिले कॉलनी, कोल्हापूर) असे या पर्यटकाचे नाव असून, ते कोल्हापूर जिल्हा परिषदेचे कर्मचारी आहेत.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सनगर हे त्यांच्या 14 सहकाऱ्यांच्या टीमसोबत आंबोली येथे वर्षा पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी आले होते. कावळेसाद पॉईंट येथे रेलिंगजवळ उभे असताना त्यांचा पाय अचानक घसरला आणि ते दरीत कोसळले. या घटनेची माहिती मिळताच आंबोली दूरक्षेत्राचे पोलीस कॉन्स्टेबल मनीष शिंदे आणि इतर पोलीस कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर आंबोली रेस्क्यू टीमला पाचारण करण्यात आले. मात्र, रात्रीचा काळोख आणि दाट धुक्यामुळे बचावकार्यात मोठ्या अडचणी येत आहेत.

गेळे गावचे सरपंच सागर ढोकरे यांनी या घटनेची माहिती दिली असून, ते देखील उशिरापर्यंत घटनास्थळी उपस्थित होते. काळोख आणि दाट धुक्यामुळे शुक्रवारी सायंकाळी शोध मोहीम राबवणे शक्य नसल्याचे स्थानिक पोलिसांनी सांगितले आहे. त्यामुळे राजेंद्र सनगर यांच्या शोधमोहिमेला शनिवार सकाळपासून सुरुवात करण्यात येईल अशी माहिती पोलिसांनी दिली

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;