मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील 19 गाड्या डिझेल ऐवजी पाणी भरून आल्या! नेमकं काय घडलं?

मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील 19 गाड्या डिझेल ऐवजी पाणी भरून आल्या! नेमकं काय घडलं?

मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील 19 इनोव्हा गाड्यांनी रात्री टाक्या फूल केल्या. सर्व गाड्यांमध्ये डिझेल भरण्यात आले. त्यानंतर या गाड्या वेगाने निघाल्या. मात्र काही अंतरावर कापल्यावर एक एक गाडी बंद पडू लागली. यामुळे एकच धावपळ सुरू झाली. चालकांनी खाली उतरून गाडीला धक्के द्यायला सुरुवात केली. एकामागोमाग एक सगळ्याच गाड्या बंद पडल्याने इंधनात काहीतरी गडबड असल्याचे चालकांच्या लक्षात आले. हा सर्व गोंधळ त्यांनी प्रशासनालाही कळवले. प्रशासनानेही तातडीने हालचाल करत तपास सुरू केला. त्यानंतर टाक्या फूल केल्यानंतरही गाड्या बंद का पडल्या हे समोर आले.

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव हे शुक्रवारी रतलाम दौऱ्यावर येणार होते. या दौऱ्यात त्यांच्यासोबत इंदूरहून 19 इनोव्हा गाड्यांचा ताफा येणार होता. या दौऱ्याची तयारीही पूर्ण झाली होती. गुरुवारी रात्री या गाड्यांनी ढोसी गावाजवळच्या भारत पेट्रोलियमच्या पेट्रोल पंपावरून टाक्या फूल करून घेतल्या. डिझेल भरून येत असताना एकामागोमाग एक गाड्या बंद पडू लागल्या. त्यामुळे एकच खळबळ उडाली.

वाहन चालकांनी तातडीने याबाबत प्रशासकीय अधिकाऱ्यांना कळवले. यानंतर सरकारी अधिकारी, कर्मचारी, पोलिसांनी पेट्रोल पंपावर धाव घेतली. काही गाड्यांचे चालकही या ठिकाणी पोहोचले. या दरम्यान याच पेट्रोल पंपावरून काही गाड्या पेट्रोल, डिझेल भरून गेल्या गेल्या. या गाड्याही अचानक बंद पडू लागल्या. त्यामुळे या गाड्यांच्या वाहन चालकांनीही गाड्यांसह तिथे गर्दी केली.

वाहनचालकांची गर्दी वाढत असल्याचे पाहून पेट्रोल पंपावर मेकॅनिकला बोलवण्यात आले आणि गाड्यांच्या टाक्या खालून पाहण्यात आले. त्यातील इंधन काढले गेले असता त्यात पाणी सापडले. मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासह अनेक नागरिकांच्या गाड्यात इंधनाऐवजी पाणी सापडल्याने प्रशासनाने तात्काळ कारवाई कर थेट पेट्रोल पंपच सील करून टाकला.

एक थेंब अन्…

दरम्यान, पावसाचे दिवस आणि इथेनॉल मिश्रीत इंधन यामुळे अनेक गाड्यांच्या टाकीमध्ये पाणी तयार होत आहे. पाण्याचा एकही थेंब बटला तरी टाक्यांमध्ये या थेंबापासून इथेनॉलबरोबर प्रक्रिया होऊन ते पाणी तयार करच आहे. त्यामुळे पेट्रोल पंपाच्या टाक्या लीक होऊन त्यात पावसाचे पाणी मिसळले गेले असावी अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र सध्या प्रशासकीय अधिकारी चौफेर चौकशी करत असून पेट्रोल, डिझेलमध्ये भेसळ आहे की नाही याचा तपास सुरू आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;