Skin Care – सुंदर दिसण्यासाठी फक्त याच तेलाचा वापर करा, वाचा

Skin Care – सुंदर दिसण्यासाठी फक्त याच तेलाचा वापर करा, वाचा

आजही अनेक घरांमध्ये फोडणीला मोहरीच्या तेलाचा वापर सहजपणे करतात. मोहरीच्या तेलाच्या वासाने नाकं मुरडणारे खूपजण आहेत. आपल्या हिंदुस्थानामध्ये अनेक राज्यांमध्ये मोहरीचे तेल हे प्रामुख्याने वापरले जाते. पराठे बनवणे असोत, मटर पनीर असो किंवा कोणतेही पदार्थ असो. काही पदार्थ हे मोहरीच्या तेलाशिवाय अपूर्ण आहेत. म्हणूनच स्वयंपाकघरात मोहरीचे तेल आवश्यक आहे. मोहरीचे तेल केवळ स्वयंपाकासाठी नाही, तर सौंदर्यासाठी सुद्धा खूप महत्त्वाचे मानले जाते. मोहरीचे तेल हृदयाच्या आरोग्यासाठी चांगले आहे, पचनास मदत करते आणि त्वचा आणि केसांना पोषण देते.

Skin Care- चेहरा धुताना पाण्यात चिमूटभर मीठ घाला, बघा काय होतील फायदे!

जाणून घेऊया मोहरीच्या तेलाचे सौंदर्यवर्धक फायदे

सनबर्न या समस्येपासून वाचण्यासाठी मोहरीच्या तेलाशिवाय दुसरा परिणामकारक उपाय नाही. मोहरीच्या तेलात व्हिटॅमिन ई असल्याने सूर्याच्या हानिकारक किरणांपासून त्वचेचे संरक्षण होते तसेच त्वचेवरील सुरकुत्यांवर परिणामकारक ठरते.

त्वचा उजळण्यासाठी आवश्यक असे अनेक गुणधर्म मोहरीच्या तेलात असतात. त्यामुळे त्वचेला कोणतेही हानी होत नाही. खोबरेल तेलात मोहरीचे तेल मिसळून चेहऱ्यावर लावा. त्यामुळे रक्तप्रवाह सुधारेल आणि त्वचाही उजळेल.

 

केस रुक्ष होणे, खाज, कोंडा यांसारख्या केसांच्या समस्येवर मोहरीचे तेल गुणकारी ठरते. आठवड्यातून एकदा मोहरीचे तेल कोमट करुन त्याने केसांना मसाज करा आणि त्यानंतर अर्ध्या तासाने केस सौम्य शॅम्पूने धुवा. केसांच्या समस्या दूर होण्यास मदत होईल व केस चमकदार होतील.

मोहरीच्या तेलाने रॅशेस पासून सुटका होते. यात अंटी फंगल आणि अंटी बॅक्टेरिअल गुणधर्म असतात. त्यामुळे त्वचेवर होणारे रॅशेस दूर होतात. यासाठी मोहरीच्या तेलात खोबरेल तेल मिसळून त्वचेवर मसाज करावा. अतिशय उपयुक्त आणि गुणकारी असा हा तोडगा आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;