‘हे’ सरकार चालवतायत की कॉमेडी शो? हिंदी सक्तीवरून आदित्य ठाकरे यांची खरमरीत टीका

‘हे’ सरकार चालवतायत की कॉमेडी शो? हिंदी सक्तीवरून आदित्य ठाकरे यांची खरमरीत टीका

पहिली पाहून हिंदी भाषा सक्तीची करण्याचा महायुती सरकारच्या निर्णय घेतला आहे. त्यावरून सध्या राज्यभरातून सरकारवर टीका होत आहे. राज्याचे शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी गुरुवारी याविषयी बोलताना इयत्ता पहिली ते तिसरीपर्यंत हिंदी भाषेचे मौखिक शिक्षण दिले जाईल असे सांगितले. त्यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी त्यावरून महायुती सरकारवर टीका केली आहे.

”शिक्षण मंत्र्यांनी स्वतः आधी शाळेत जाऊन बसावं आणि असे धडे घ्यावेत! आधीच पहिलीतल्या मुलांवर तीन भाषा शिकण्याची सक्ती, त्यात पुस्तक नाही तर मौखिक अभ्यास! हे सरकार चालवताएत की कॉमेडी शो? काय बोलताय, काय ठरवताय, स्वतः जरा ऐकून बघा आणि यांनाच आधी पहिलीत पाठवा! तिथेही ‘नापास’ होतील.”, असे आदित्य ठाकरे यांनी ट्विट केले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;