धारावी हा भाजपचा जगातला सगळ्यात मोठा जमीन घोटाळा, अदानीला विरोध करणारच; आदित्य ठाकरे यांचा इशारा

धारावी हा भाजपचा जगातला सगळ्यात मोठा जमीन घोटाळा, अदानीला विरोध करणारच; आदित्य ठाकरे यांचा इशारा

धारावी हा जगातला सगळ्यात मोठा जमीन घोटाळा असू शकतो. मात्र भाजपला आम्ही हा घोळाला करू देणारा नाही, असा इशारा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी सरकारला दिला आहे. आज धारावीमधील मेघवाडी येथील सगळे स्थानिकांनी आदित्य ठाकरे यांची भेट घेतली. यानंतर माध्यमांशी संवाद साधताना ते असं म्हणाले आहेत.

माध्यमांशी संवाद साधताना आदित्य ठाकरे म्हणाले आहेत की, “आज धारावीमधील मेघवाडी येथील सगळे स्थानिक मला भेटायला आले होते. या लोकांनी अदानी समूह आणि महाराष्ट्र शासनावर विश्वास ठेवून सर्वेक्षण करू दिलं. सर्वेक्षणामध्ये पहिल्याच यादीत 80 टक्के लोकांना अपात्र ठरवलं. मेघवाडीत हा समाज जवळपास 150 वर्ष तिथे राहत आहे. यात सगळे झोपडपट्टी क्षेत्र नाही. मात्र तरी देखील सर्वेक्षण केलं आणि त्यात 80 टक्के लोकांना अपात्र ठरवून यांना देवनारच्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर पाठवणार. अदानी याला आम्ही विरोध करणार म्हणजे करणारच. मुंबई ही नागोशेबल नाहीय. मुंबईसाठी आणि धारावीसाठी आम्ही लढत राहू आणि कुठल्याही मालकाच्या घशात आम्ही ही जाऊ देणार नाही.”

आदित्य ठाकरे पुढे म्हणाले की, “धारावी पुनर्विकास प्रकल्पात दोन मागण्या महत्त्वाच्या आहेत. पहिलं म्हणजे पात्रात ही 2022 कट ऑफ ठेवावी. दुसरं म्हणजे सगळीकडे एसआरएमध्ये तिकडच्या तिकडे रहिवाशांना घरे दिली जातात. यांनाही तिकडच्या तिकडे घरे मिळालीत पाहिजेत. कारण धारावी हा जगातला सगळ्यात मोठा जमीन घोटाळा असू शकतो. आता आमच्या कानावर येत आहे की, एफएसआय 1.33 चा प्राप्त होण्यासाठी अदानी हे शौचालयचे ही सर्वेक्षण करत आहे आणि ते देखील प्रॉपर्टीमध्ये दाखवत आहेत. म्हणजेच सार्वजनिक शौचालय असेल, कुठलं बेंच, पोल असेल हे देखील दाखवायचं सर्वेसक्षणात आणि मग त्याच्या अगेन्स्ट 1.33 चा एफएसआय घ्यायचा, हा आता अदानींचा प्रयत्न आहे. मात्र हा जगातला सगळ्यात मोठा जमीन घोळाला आम्ही भाजपला करू देणार नाही.”

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;