Mumbai News – चिमुकलीने खेळण्यातला मोबाईल तोंडात घातला, मुंबईत शस्त्रक्रिया करून डॉक्टरांनी वाचवले प्राण

Mumbai News – चिमुकलीने खेळण्यातला मोबाईल तोंडात घातला, मुंबईत शस्त्रक्रिया करून डॉक्टरांनी वाचवले प्राण

मुंबईतील धारावी परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दोन वर्षाच्या चिमुकलीच्या श्वसननलिकेतून डॉक्टरांनी यशस्वी शस्त्रक्रिया करत छोटा एलईडी लाईट काढला. सध्या मुलीची प्रकृती स्थिर आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली. पालकांनी वेळीच रुग्णालयात नेले आणि वेळीच शस्त्रक्रिया केल्याने मुलीचे प्राण वाचले.

काय घडलं नेमकं?

दोन वर्षांची चिमुकली घरी खेळत होती. खेळता-खेळता तिने खेळण्यातील मोबाइल तोंडात घातला. यावेळी मोबाईलमधील छोटा एलईडी लाईट मुलीच्या श्वसननलिकेत गेला. यामुळे मुलीला सतत खोकला येत होता आणि दम लागत होता. पालकांनी मुलीला तात्काळ रुग्णालयात नेले. तेथे मुलीचा एक्सरे आणि काही तपासण्या करण्यात आल्या. एक्स रे मध्ये श्वसननलिकेत काहीतरी वस्तू असल्याचे आढळले.

कान, नाक, घसा विभागाचे तज्ज्ञ डॉ. शशिकांत म्हसाळ यांच्या टीमने मुलीवर एन्डोस्कॉपीद्वारे शस्त्रक्रिया करत तिच्या श्वसननलिकेत अडकलेला एलईडी लाईट काढला. आता प्रकृती स्थिर आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;