Western Railway Jumbo Block – पश्चिम रेल्वेवर जम्बो ब्लॉक, अप आणि डाऊन मार्गावरील जलद वाहतुकीवर परिणाम
पश्चिम रेल्वेवर वसई रोड ते वैतरणा स्थानकांदरम्यान 27 जून आणि 28 जून रोजी जम्बो ब्लॉक घेण्यात येणार आहे. ओव्हरहेड वायर, सिग्नल आणि ट्रॅकच्या दुरुस्तीसाठी हा जम्बो ब्लॉक घेण्यात आला आहे. या ब्लॉकमुळे अप आणि डाऊन दोन्ही जलद मार्गावरील लोकल वाहतुकीवर त्याचा परिणाम होणार आहे.
पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक यांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री 11.50 ते शनिवारी पहाटे 2.50 वाजेपर्यंत अप जलद मार्गावर आणि पहाटे 1.30 ते पहाटे 4.30 वाजेपर्यंत डाउन जलद मार्गावर ब्लॉक घेण्यात येईल. जम्बो ब्लॉकमुळे, विरार-भरूच मेमू ट्रेन 15 मिनिटे उशिराने सुटेल. रविवारी उपनगरीय गाड्यांच्या पश्चिम मार्गावर कोणताही ब्लॉक नसेल.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List