हे करून पहा – घरात डासांचा त्रास वाढलाय का?
कडुलिंबाचा रस – पावसाळ्यात मच्छर, डासांच्या त्रासापासून सुटका करण्यासाठी घरात कडुलिंबाचा रस ठेवा. कडुलिंबाचा रस पाण्यात मिसळून त्याची घरात फवारणी केल्यास घरातील डासांपासून सुटका मिळवता येऊ शकते. कडुलिंब मिळत नसेल तर लिंबू आणि लवंग घरात उघडय़ावर ठेवल्यास डास घरात येत नाहीत.
लसून स्प्रे – डास हे लसणाचा वास सहन करू शकत नाहीत. त्यामुळे लसणाच्या चार ते पाच पाकळ्या हलक्या बारीक करून त्याला एका छोटय़ा भांडय़ात मिसळून सोबत उकळा. हे पाणी थंड झाल्यावर घरात स्प्रे केल्यास मच्छर, डासांचा त्रास कमी होतो.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List