Benefits Of Pickle – चमचाभर लोणचे खा आणि निरोगी राहा, वाचा
आपल्या आहारामध्ये काही पदार्थांचं महत्त्व हे अबाधित आहे. रोजच्या ताटात चमचाभर लोणचे खाण्याचे असंख्य फायदे आहेत. आपल्या आहारात लोणचं खाण्याचा सर्वात मोठा आणि महत्त्वाचा फायदा म्हणजे त्यातील प्रोबायोटिक घटक. आपल्या शरीरासाठी प्रोबायोटिक्स हे चांगले बॅक्टेरिया खूप गरजेचे असतात. प्रोबायोटिक आपल्या शरीराच्या पचनासाठी खूप उपयोगी आहेत. म्हणूनच किमान चमचाभर लोणचं हे ताटात असायलाच हवं.
लोणचं करणं हा आपल्याकडे परंपरागत प्रथेचा भाग आहे. एक काळ होता, आपल्या घरातील काकी, आजी या लोणचं करण्यासाठी सरसावुन बसायच्या. आजही आपल्या धावपळीच्या युगात घरी लोणचं केलं नाही तरी, आपल्या किचनमध्ये लोणच्याची बाटली ही असतेच. वरण भाताच्या जोडीला लोणचं खाण्याची प्रथा आपल्याकडे आज नाही. तर लोणच्याचं महत्त्व हे आपल्या स्वयंपाकघरामध्ये फार पूर्वीपासून आहे. पूर्वीच्या काळी लोणचं करणं हा एक यथासांग कार्यक्रम असायचा. घरातील आजी, काकी लोणचं करताना तल्लीन होऊन करायच्या. लोणचं म्हणजे वर्षभराची बेगमी असायची. नानाविध लोणची ही आपल्या स्वयंपाकघरातील बरण्यांमध्ये विराजमान व्हायची.
Benefits Of Curd – फक्त एक वाटी दही म्हणजे निरोगी आरोग्याची गुरुकिल्ली! वाचा
लोणच्यामध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स असतात, जे ऑक्सिडेटिव्ह प्रेशर रोखण्यासाठी आणि शरीराला सैल रॅडिकल्सपासून वाचवण्यासाठी महत्त्वाचे ठरू शकतात.
लोणच्यामध्ये असलेले हर्बल अँटीऑक्सिडंट्स रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास आणि संक्रमणांना दूर ठेवण्यास मदत करू शकतात.
लोणचे वजन कमी करण्यासाठी सुद्धा खूप महत्त्वाचे मानले जाते.
लोणच्याचं आहारातलं महत्त्व काय आहे हे आपण जाणून घेऊया.
लोणचं हे आंबवलेले असल्यामुळे त्यात असलेल्या प्रोबायोटिक्समुळे आपल्या आतड्याचे आरोग्य उत्तम राखले जाते.
पचनसंस्था सुधारण्यासाठी तसेच रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी लोणचं हे अतिशय महत्त्वाचं मानलं जातं.
व्हिटॅमिन सी हे लोणच्यामध्ये मुबलक प्रमाणात असल्यामुळे हाडांच्या आरोग्यासाठी लोणचं हे गुणकारी आहे.
रक्तातील साखरेची पातळी सुद्धा लोणचं खाण्यामुळे कमी राहण्यास मदत होते.
शरीरातील जळजळ कमी करण्यासाठी लोणचं खाणं हा एक उत्तम पर्याय आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List