गजराज बिथरला! अहमदाबादच्या जगन्नाथ रथयात्रेत हत्तींचा थरार, भाविकांची पळापळ

गजराज बिथरला! अहमदाबादच्या जगन्नाथ रथयात्रेत हत्तींचा थरार, भाविकांची पळापळ

जगप्रसिद्ध जगन्नाथ रथयात्रा शुक्रवारपासून सुरू झाली. पुरीसह देशभरातील प्रमुख शहरांमध्येही आता जगन्नाथ रथयात्रा निघते. गुजरातमधील अहमदाबाद येथेही शुक्रवारी सकाळी जगन्नाथ रथयात्रा निघाली. मात्र या रथयात्रेवेळी काही हत्ती बिथरले आणि भाविकांची एकच पळापळ सुरू झाली. या दरम्यान चार भाविक जखमी झाले.

डीजेच्या आवाजाने हे हत्ती बिथरल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. या घटनेचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यात बिथरलेला हत्ती वाट दिसेल तिकडे आणि हत्तीच्या भीतीने लोक सैरावैरा धावताना दिसत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)

अहमदाबादमध्ये शुक्रवारी 148 वी जगन्नाथ रथयात्रा काढण्यात आली. या रथयात्रेच्या पुढे 17 हत्तींचा एक गट चालत होता. याच दरम्यान अचानक तीन हत्ती बिथरले. यातील दोन मादी हत्ती, तर एक नर हत्ती होता. बिथरलेले हत्ती अनियंत्रित झाल्याने रथयात्रेत सहभागी झालेले भाविक सैरावैरा पळू लागले. अखेर वन विभागाने या हत्तींवर नियंत्रण मिळवले. सध्या या तीन हत्तींना रथयात्रेतून हटवण्यात आले असून 14 हत्तींसह रथयात्रा पुढे सरकत आहे.

जगन्नाथ रथयात्रेचा मार्ग सोन्याच्या झाडूने का स्वच्छ करतात? जाणून घ्या काय आहे पौराणिक मान्यता

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;