ICC ने टी-20 क्रिकेटच्या नियमांमध्ये केला महत्त्वपूर्ण बदल, षटकांच्या संख्येवर ठरणार पॉवरप्ले

ICC ने टी-20 क्रिकेटच्या नियमांमध्ये केला महत्त्वपूर्ण बदल, षटकांच्या संख्येवर ठरणार पॉवरप्ले

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमच्या काही नियमांमध्ये महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. ज्यामध्ये आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमधील पॉवरप्लेच्या नियमाचा सुद्धा समावेश आहे. बऱ्याच वेळा पावसाच्या व्यत्ययामुळे किंवा अन्य काही कारणांमुळे षटकांची संख्या कमी करावी लागते. त्याचा परिणाम पॉवरप्लेच्या षटकांवर सुद्धा होता. त्यामुळे ICC ने आता पॉवरप्लेच्या षटकांची संख्या निश्चित केली आहे. म्हणजेच षटकांच्या संख्येनुसार पॉवरप्लेची षटके निश्चित करण्यात आली आहेत.

टी-20 क्रिकेटमध्ये साधारणपणे 6 षटकांचा पॉवरप्ले असतो. जर काही कारणांमुळे षटकांची संख्या कमी झाली तर पॉवरप्लेचा नवीन नियम आता लागू होणार आहे. नवीन नियमांनुसार, जर एखादा सामना 19 षटाकांचा खेळला गेला तर, त्या सामन्यात 5.4 षटकांचा पॉवरप्ले खेळला जाईल. ICC ने पाच षटकांपासून ते 19 व्या षटकापर्यंत पॉवरप्लेच्या षटकांची संख्या निश्चित केली आहे.

पुढील प्रमाणे षटकांची आणि पॉवरप्लेची संख्या निश्चित करण्यात आली आहे

  • 5 षटकांचा खेळ – 1.3 षटकांचा पॉवरप्ले
  • 6 षटकांचा खेळ – 1.5 षटकांचा पॉवरप्ले
  • 7 षटकांचा खेळ – 2.1 षटकांचा पॉवरप्ले
  • 8 षटकांचा खेळ – 2.2 षटकांचा पावरप्ले
  • 9 षटकांचा खेळ – 2.4 षटकांचा पावरप्ले
  • 10 षटकांचा खेळ – 3 षटकांचा पॉवरप्ले
  • 11 षटकांचा खेळ – 3.2 षटकांचा पावरप्ले
  • 12 षटकांचा खेळ – 3.4 षटकांचा पावरप्ले
  • 13 षटकांचा खेळ – 3.5 षटकांचा पावरप्ले
  • 14 षटकांचा खेळ – 4.1 षटकांचा पावरप्ले
  • 15 षटकांचा खेळ – 4.3 षटकांचा पावरप्ले
  • 16 षटकांचा खेळ – 4.5 षटकांचा पावरप्ले
  • 17 षटकांचा खेळ – 5.1 षटकांचा पावरप्ले
  • 18 षटकांचा खेळ – 5.2 षटकांचा पावरप्ले
  • 19 षटकांचा खेळ – 5.4 षटकांचा पावरप्ले

‘शॉर्ट रन’ महागात पडणार, आयसीसीच्या नव्या नियमांमुळे पंचांच्या अधिकारांमध्ये वाढ

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;