Kolkata News – लॉ कॉलेजच्या विद्यार्थिनीवर कँम्पसमध्ये सामूहिक अत्याचार

Kolkata News – लॉ कॉलेजच्या विद्यार्थिनीवर कँम्पसमध्ये सामूहिक अत्याचार

आरजी मेडीकल कॉलेजमधील घटनेनंतर पुन्हा एकदा सामूहिक अत्याचाराच्या घटनेने कोलकाता हादरले आहे. पश्चिम बंगालमधील साऊथ कोलकातामधील लॉ कॉलेजमध्ये ही थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. कॉलेजच्या कँम्पसमध्ये 25 जून रोजी आजी-माजी विद्यार्थ्यांनी एका विद्यार्थिनीवर सामूहिक अत्याचार केला. याप्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. तिन्ही आरोपींना 14 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

मुख्य आरोपी मोनोजीत मिश्रा हा कॉलेजमधील माजी विद्यार्थी आणि तृणमूल काँग्रेस विद्यार्थी परिषदेचा अध्यक्ष आहे. जैब अहमद आणि प्रमित मुखर्जी अशी अन्य दोन आरोपींची नावे आहेत.

पीडितेने दिलेल्या फिर्यादीनुसार, आरोपींनी तरुणीला शरीरसंबंध बनवण्यासाठी दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र पीडितेने नकार देत आरोपींना धक्का दिला. त्यानंतर आपल्याला जाऊ देण्याची विनंती आरोपीकडे केली. मी रडले, त्यांना सांगितले मी रिलेशनशीपमध्ये आहे, माझा बॉयफ्रेंड आहे, मला जाऊ द्या; पण त्यांनी ऐकले नाही. मला पॅनिक अटॅक आला आणि श्वास घ्यायला त्रास होऊ लागला. मी त्यांना रुग्णालयात नेण्यास सांगितले, मात्र त्यांनी माझी मदत केली नाही, असे पीडिता म्हणाली.

आरोपींनी कॉलेजचा मेन गेट बंद केला. सुरक्षारक्षकही असहाय्य होता आणि त्याने माझी मदत केली नाही. ते मला जबरदस्ती सुरक्षारक्षकाच्या खोलीत घेऊन गेले. माझे कपडे काढले आणि माझ्यावर बलात्कार केला. त्यानंतर मला ब्लॅकमेल करत माझ्या मित्राला मारुन टाकण्याची आणि माझ्या आई-वडिलांना अटक करण्याची धमकी दिली, असे पीडितेने पुढे नमूद केले.

आरोपीने बलात्काराचा व्हिडिओ बनवत धमकावले आणि आपल्याला सहकार्य न केल्यास व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली. मी जेव्हा रुममधून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला तेव्हा मला हॉकी स्टिकने मारण्याचा प्रयत्न केला, असे सांगत पीडितेने न्यायाची मागणी केली.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडिता 25 जून रोजी परीक्षा फॉर्म भरण्यासाठी कॉलेमध्ये गेली होती. ती कॉलेजमधील युनियन रुममध्ये बसली होती. त्यानंतर मुख्य आरोपीने त्याला पकडले. कॉलेजचे मेन गेट बंद करण्याचे निर्देश दिले. त्यानंतर सुरक्षारक्षकाच्या खोलीत नेऊन तिच्या बलात्कार केला. ही घटना सायंकाळी 7.30 ते रात्री 10.30 वाजण्याच्या सुमारास घडली.

पीडितेच्या फिर्यादीनंतर कथित सामूहिक बलात्कार प्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला आहे. पीडितेची प्राथमिक वैद्यकीय चाचणी करण्यात आली आहे. घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला असून फॉरेन्सिक तपासासाठी सुरक्षित ठेवण्यात आले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;