Palghar News – खड्ड्यातील पाण्यात पोहण्यासाठी गेलेल्या तीन मुलांचा बुडून मृत्यू, मृतांमध्ये सख्ख्या भावांचा समावेश

Palghar News – खड्ड्यातील पाण्यात पोहण्यासाठी गेलेल्या तीन मुलांचा बुडून मृत्यू, मृतांमध्ये सख्ख्या भावांचा समावेश

खड्ड्यातील पाण्यात पोहण्यासाठी गेलेल्या चारपैकी तीन मुलांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना बोईसरमध्ये घडली. मृतांमध्ये दोन सख्ख्या भावांचा सामावेश आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. सुरज यादव, धीरज यादव, अंकित गुप्ता अशी या मृत मुलांची नाव असून ते बोईसरमधील गणेशनगर परिसरातील रहिवासी आहेत. शुक्रवारी दुपारी एक ते दीड वाजेच्या सुमारास ही घटना घडली.

गणेश नगर परिसरातील झोपडपट्टीत राहणारी चार शाळकरी मुले दुपारच्या सुमारास घराच्या पाठीमागे असलेल्या मोकळ्या जागेतील पाण्याने भरलेल्या खड्ड्यात पोहण्यासाठी गेली. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने तीन मुलं पाण्यात बुडाली तर एकाला वाचवण्यास यश आले आहे.

घटनेची माहिती मिळताच बोईसर पोलीस आणि तारापूर अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी पोहचून तीन मुलांचे मृतदेह बाहेर काढले. तीनही मृतदेह वैद्यकीय तपासणीसाठी बोईसर ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;