सकाळी उठल्यावर मान दुखतेय? मग झोपताना नक्की करताय ही गंभीर चूक

सकाळी उठल्यावर मान दुखतेय? मग झोपताना नक्की करताय ही गंभीर चूक

गोड झोप ही शरीरासाठी तितकीच गरजेची असते, जितकी अन्न आणि पाण्याची गरज असते. मात्र, झोपताना केलेल्या काही चुकीच्या सवयींमुळे मान दुखणे ही समस्या निर्माण होऊ शकते. अनेकांना सकाळी उठल्यानंतर मानेत कडकपणा, मान फिरवताना त्रास किंवा एकाच जागेवर तीव्र वेदना जाणवतात. ही समस्या केवळ तात्पुरती नसून दीर्घकाळ टिकल्यास ती मोठ्या त्रासाचे कारण ठरू शकते. विशेषत: आपल्या झोपण्याच्या पद्धतीकडे लक्ष दिले नाही तर हा त्रास अधिक वाढू शकतो.

उशी वापरणे : मान दुखण्यामागे सगळ्यात मोठं कारण म्हणजे चुकीचा उशी वापरणं. जर उशी खूप उंच असेल तर मानेवर अतिरिक्त ताण येतो, ज्यामुळे स्नायूंमध्ये ताण निर्माण होतो. त्याचप्रमाणे खूपच पातळ किंवा सपाट उशी वापरल्यास देखील मान योग्य पोझिशनमध्ये राहत नाही आणि त्यामुळे झोपेतही मान वळते, झुकते आणि त्याचा त्रास सुरू होतो. म्हणून उशी नेहमी मान व डोक्याला योग्य सपोर्ट देणारी निवडावी.

झोपताना हात डोक्याखाली ठेवणे : अनेक लोक साइडमध्ये झोपताना आपला हात डोक्याखाली ठेवतात. ही सवय अतिशय चुकीची असून, त्यामुळे मानेला अनावश्यक वळण मिळते. स्नायूंवर ताण येतो आणि सकाळी उठल्यावर मानेत जडपणा जाणवतो. त्यामुळे साइडमध्ये झोपताना हात नेहमी सरळ ठेवावा व योग्य सपोर्ट असलेली उशी वापरावी.

सतत हालचाल करणे : रात्रभर सतत हालचाल करणं देखील मानेच्या दुखण्याचं एक कारण ठरू शकतं. झोपेत स्थिर पोझिशनमध्ये राहणं मानेसाठी उत्तम असतं. सतत हालचाल केल्याने स्नायूंना विश्रांती मिळत नाही व त्यामुळे सकाळी दुखणे जाणवते. शक्य असल्यास झोपताना एका आरामदायक पोझिशनमध्ये स्थिर राहण्याचा प्रयत्न करा.

गादीचा वापर : फक्त उशीच नव्हे तर गादी देखील तितकीच महत्त्वाची असते. खूपच टणक किंवा खूपच मऊ गादी देखील झोपेची पोझिशन बिघडवू शकते. त्यामुळे शरीराला योग्य पाठिंबा देणारी ऑर्थोपेडिक गादी निवडावी. योग्य गादीमुळे मानेचा नैसर्गिक वाकाच जपला जातो व दुखणे टाळता येते.

दुखणं टाळण्यासाठी काय करावं?

1. मानेला योग्य आधार देणारी उशी वापरा.

2. साईडमध्ये झोपताना हात डोक्याखाली ठेवू नका.

3. शक्य तितकं स्थिर झोपण्याचा प्रयत्न करा.

4. योग्य गादीची निवड करा.

5. झोपण्याआधी हलक्या मानेचा व्यायाम करा.

6. जर दुखणे सातत्याने होत असेल तर लवकरात लवकर डॉक्टरांचा सल्ला घ्या.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही.)

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;