संदीपान भुमरेंच्या ड्रायव्हरला 150 कोटी रुपयांची तीन एकर जमीन भेट! आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी सुरू

संदीपान भुमरेंच्या ड्रायव्हरला 150 कोटी रुपयांची तीन एकर जमीन भेट! आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी सुरू

मिंधे गटाचे खासदार संदीपान भुमरे यांच्या ड्रायव्हरला हैदराबादच्या प्रतिष्ठित सालार जंग कुटुंबाकडून 150 कोटी रुपये किंमतीची तीन एकर जमीन भेट म्हणून देण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. ही जमीन छत्रपती संभाजीनगरमधील जालना रोडवरील दाऊदपुरा येथे आहे. आता याच प्रकरणी संदीपान भुमरे, आमदार विलास भुमरे आणि त्यांचा चालक जावेद रसूल यांची आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी सुरू आहे.

माल्ल्या माहितीनुसार, जावेद रसूल शेख हा गेल्या 13 वर्षांपासून खासदार संदीपान भुमरे आणि त्यांचे आमदार पुत्र विलास भुमरे यांच्याकडे ड्रायव्हर म्हणून काम करतो. सालार जंग कुटुंबातील मीर मझहर अली खान आणि त्यांच्या सहा नातेवाईकांनी हिबानामा (भेटपत्र) तयार करून ही जमीन जावेदच्या नावे केली. मात्र या व्यवहारावर परभणी येथील वकील मुजाहिद खान यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली, ज्यामुळे आर्थिक गुन्हे शाखेकडून याची चौकशी सुरू केली.

काय आहे संशय?

याबाबत बोलताना वकील मुजाहिद खान म्हणाले आहेत की, ही जमीन ड्रायव्हर जावेद रसूल शेख याला बक्षीसपत्राद्वारे मिळवली. जी जवळपास 12 एकर जमीन संभाजीनगर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असून याची किंमत 150 कोटी रुपये इतकी आहे. ही जमीन संदिपान भूमरे आणि त्यांच्या मुलाने ड्रायव्हर जावेद रसूल शेख याच्या नावावर खरेदी केल्याचा आरोप मुजाहीत खान यांनी केला आहे. त्यांनी पुढे म्हटलं आहे की, रक्ताच्या नात्यातील व्यक्तीने हिबानामा केल्यास तो कायदेशीररित्या वैध ठरतो. मात्र सालारजंगचे वंशज आणि भुमरे यांचा चालक यांचा काहीही संबंध नाही. म्हणूनच या प्रकरणी संशय बळावला असून गुन्हे शाखेकडून याची चौकशी सुरु आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;