दोन-तीन दिवसांत मान्सूनचा जोर वाढणार; मुंबईत येलो अलर्ट, कोकणात ‘जोर’धारा कोसळणार

दोन-तीन दिवसांत मान्सूनचा जोर वाढणार; मुंबईत येलो अलर्ट, कोकणात ‘जोर’धारा कोसळणार

मागील 15 दिवस दडी मारलेल्या मोसमी पावसाचा मुंबई तसेच उर्वरित महाराष्ट्रातील जोर वाढणार आहे. पुढील दोन-तीन दिवसांत मुंबई शहर व उपनगरांत मुसळधार पाऊस कोसळणार आहे, तर दक्षिण कोकणला अतिमुसळधार पावसाचा तडाखा बसेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्याअनुषंगाने मुंबईला येलो अलर्ट आणि दक्षिण कोकणला ऑरेंट अलर्ट जारी केला आहे.

मे महिन्यात जोरदार हजेरी लावणारा पाऊस जूनमध्ये काही दिवस (19 जून) वगळता ‘थंड’च पडला. आता मुंबई शहर आणि उपनगरांसह कोकण किनारपट्टी भागात मान्सून अधिक सक्रिय होणार असल्याचे भाकीत हवामान खात्याने केले आहे. दक्षिण कोकणात, विशेषतः रायगड जिह्याला मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा तडाखा बसणार असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिह्यातही पावसाचा जोर वाढणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. या तिन्ही जिह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करून स्थानिक नागरिकांसह मच्छीमारांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मुंबईसह आसपासच्या ठाणे आणि पालघर या जिह्यांना ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.

n भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार, जून महिना सुरू झाल्यापासून आतापर्यंत कुलाबा केंद्रावर 477 मिमी पावसाची नोंद झाली आहे. हा पाऊस सरासरीपेक्षा 130 मिमी जास्त आहे. तसेच सांताक्रूझ केंद्रावर सरासरीपेक्षा कमी म्हणजेच 425 मिमी इतक्या पावसाची नोंद झाली आहे. मान्सून 15 दिवस गायब राहिला. त्यात फक्त 19 जून रोजी कुलाब्यात रेकॉर्डब्रेक पाऊस पडला. त्या दिवशी 24 तासांत 146 मिमी पावसाची नोंद झाली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;