सुट्टी मिळावी म्हणून मित्राला शॉक देऊन मारले. कोल्हापूरच्या मदरशातील धक्कादायक घटना

सुट्टी मिळावी म्हणून मित्राला शॉक देऊन मारले. कोल्हापूरच्या मदरशातील धक्कादायक घटना

मदरशात शिक्षण घेणाऱया विद्यार्थ्याने मदरसा बंद पडून सुट्टी मिळण्यासाठी मित्राचा खून केला. कोल्हापूर जिह्यातील हातकणंगले तालुक्यात असलेल्या आळते येथील मदरशात ही घटना उघडकीस आली. रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत तोंडात कापडाचा बोळा कोंबून, विजेचा शॉक देऊन हा खून करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. फैजान नजीम (11, रा. बिहार) असे अल्पवयीन खून झालेल्या विद्यार्थ्याचे नाव असून पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेत बाल निरीक्षणगृहात त्याची रवानगी केली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आळते येथील निजामिया मदरशात साठहून अधिक मुले धार्मिक शिक्षण घेत आहेत. 16 जून रोजी पहाटे पाच वाजता फैजान नजीम या अल्पवयीन मुलाचा संशयास्पद मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत सीसीटीव्हीच्या आधारे आणि चौकशीद्वारे तपास सुरू केला. चौकशीदरम्यान संशयित मुलगा घाबरून काहीही सांगत नव्हता. त्याला बोलते करण्यासाठी पोलिसांनी महिला व बालविकास अधिकारी आणि सदस्यांना व मानसोपचार तज्ञांना बोलवले. यानंतर अल्पवयीन मुलाने त्यांच्यासमोर सुट्टी मिळावी आणि घरी जाता यावे यासाठी खून केल्याची कबुली दिली. या घटनेनंतर या परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या गुह्यात आणखी काही मुलांचा समावेश असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला असून त्यानुसार आणखी दोन अल्पवयीन मुलांची चौकशी सुरू आहे. या प्रकरणानंतर मदरशांमधील विद्यार्थ्यांची सुरक्षा आणि धार्मिक शिक्षणामुळे मानसिकतेवर होणारे परिणाम, बाल हक्कांवर आलेल्या बंधनामुळे हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;